फाइल शेअरिंगसाठी तरूणाने तयार केलं,‘मेड इन इंडिया’अ‍ॅप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 August 2020

तरूणाने dodo drop नावाचं अॅप तयार केलं आहे. या अॅपमधून ऑडिओ, व्हिडिओ, इमेज आणि टेक्स्ट शेअर करता येऊ शकतो. 

फाइल शेअरिंगसाठी तरूणाने तयार केलं,‘मेड इन इंडिया’अ‍ॅप

भारत आणि चीन या दोन देशांमधील सीमावाद संघर्षाला गेला आणि चीनमधील अनेक गोष्टींवर केंद्र सरकारने बंदी घातली. त्यामुळे चीन सरकारचे अनेक लोकप्रिय अॅप बंद झाले. भारतात चीनीअॅपचे अनेक युझर आहेत. बंद झालेल्या अॅपमुळे युजरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तरूणाने dodo drop नावाचं अॅप तयार केलं आहे. या अॅपमधून ऑडिओ, व्हिडिओ, इमेज आणि टेक्स्ट शेअर करता येऊ शकतो. 

अॅप तयार करणा-या तरूणाचं नावं अश्पाक महमूद चौधरी असून तो जम्मू काश्मीर मधील राजौरा जिल्ह्यात राहतो. चीनचं शेअर इट अॅप बंद झाल्यानंतर त्या पर्यायी अॅप तयार केलं. शेअर इट अॅप बंद झाल्यानंतर अनेकांना अडचणीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अश्पाक महमूद चौधरी या तरूणाने त्या पध्दतीचं एक अॅप तयार करण्याचं ठरवलं. 

महमूद चौधरीनं तयार केलेल्या अॅपमध्ये दोन मोबाईलमध्ये विना इंटरनेटचं ऑडिओ, व्हिडिओ, इमेज आणि टेक्स्ट शेअर करता येऊ शकतो. हे नुकतचं लॉन्च केलं असून ४८० एमबीपीएसच्या स्पीडनं फाइल शेअर करता येऊ शकते. हे स्पीड शेअर इटपेक्षाही फास्ट असल्याचे अश्पाकने सांगितले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News