‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची क्रेझ जोशात सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 5 November 2019

बचत केलेल्या खर्चातून कर्करोगग्रस्तांना मदत -कोल्हापूर- जगभरात एखादी स्टाईल आली की ती आता सोशल मीडियावरून थेट प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचते. चालू नोव्हेंबर जगभरातील तरुणाई ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणून साजरा करणार आहे आणि त्यात येथील तरुणाईही सहभागी होणार आहे.

रुजतेय संकल्पना - बचत केलेल्या खर्चातून कर्करोगग्रस्तांना मदत -कोल्हापूर- जगभरात एखादी स्टाईल आली की ती आता सोशल मीडियावरून थेट प्रत्येकाच्या उंबऱ्यापर्यंत येऊन पोचते. चालू नोव्हेंबर जगभरातील तरुणाई ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ म्हणून साजरा करणार आहे आणि त्यात येथील तरुणाईही सहभागी होणार आहे. त्यासाठी सलून व्यावसायिकांनी आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाइल्स उपलब्ध केल्या आहेत.दरम्यान, गेल्या दोन-तीन वर्षांत ही संकल्पना शहरात आली असून आता उपनगरांतही ती रुजू लागली आहे.

दाढी-मिशा ही तरुणाई न काढता विविध स्टाईल्स करणार असली तरी त्यातून बचत होणारी रक्कम कर्करोगग्रस्तांना देणार आहे.  तारुण्याच्या उंबरठ्यावर ओठावर मिशा आल्या, की मिशा आणि दाढी ठेवणं, त्यातही स्टाईल जपणं ही कोल्हापूरची खासियत; पण गेल्या काही वर्षांत विविध सेलिब्रिटींचे अनुकरण करत ‘चकाचक दाढी-मिशा’ ही क्रेझही वाढली. मात्र, सोशल मीडियावरून ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ कॅम्पेनने जोर धरला.  

मुळात जगभरात हे कॅम्पेन सुरू होण्यामागची भूमिका वेगळी आहे. नोव्हेंबर महिन्यात दाढी न करता त्यावर खर्च होणारे पैसे कर्करोगाशी सामना करणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी देणं हा या कॅम्पेनचा उद्देश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील विविध देशांत हे कॅम्पेन सुरू असले तरी सोशल मीडियामुळे आता ते तळागाळापर्यंत पोचले आहे. त्याचाच परिणाम यंदाही येथील तरुणाईमध्ये जाणवू लागला आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News