प्रिया वारियरच्या व्हायरल व्हिडीओची क्रेझ कायम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 September 2020

प्रिया वारियरच्या व्हायरल व्हिडीओची क्रेझ कायम

प्रिया वारियरच्या व्हायरल व्हिडीओची क्रेझ कायम

सोशल मीडियामुळे अनेकांचे चांगले, वाईट किंवा अन्य पध्दतीचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि आजही असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. व्हिडीओच्या माध्यामातून अनेकांचे चांगले झाल्याची अनेक उदाहरणं भारतात आहेत. प्रत्येक क्षेत्रातले व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे अनेकांना चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. अनेकांचं कौतुक कराव तेवढं कमी असेही काही व्हिडीओ आत्तापर्यंत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहचले आहेत. आज ही असे व्हिडीओ वारंवार पाहिले जातात.

भारतात चित्रपट क्षेत्रात काम करणा-यांचे  व्हिडीओ सुध्दा मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंत व्हायरल झाले आहेत. तसेच व्हारल व्हिडीओमुळे त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. ‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया वारियर हे नाव आता भारतातल्या लोकांसाठी नवीन राहिलेलं नाही. ‘ओरु अदार लव्ह’ या चित्रपटात प्रियाने तिच्या डोळ्यांनी अनेकांना घायाळ केले. तसेच तिचे त्या अनेक व्हिडीओ व्हायरल सुध्दा झाले आहेत. त्यामुळे तिची ओळख एका वेगळ्या पध्दतीने झाली आहे. तेव्हापासून प्रियाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

‘ओरु अदार लव्ह’या चित्रपटानंतर प्रियाचे भारतात असंख्य चाहते निर्माण झाले आहेत. तिच्या डोळ्यांच्या अदामुळे तिचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवरती यशस्वी ठरला. त्यामुळे प्रिया प्रचंड प्रसिध्द झाली. तसेच तिचे चित्रपटातील काही सीन फेसबुक, ट्विट, इंन्टाग्राम आणि युट्यूबवरती आजही पाहिले जातात. नुकताच तिने सोशल मीडियावरती एक व्हिडीओ व्हायरल केला असून तिचे तो सुध्दा चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रियाने नुकतंच एक युट्युबवर तिचं नवीन चॅनेल सुरु केलं आहे. हे अकाऊंट तिच्या नावाने सुरू केलं असून तिथं तिने एक नवा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून त्यामुळे प्रियाचं नवीन रूप तिच्या चाहत्यांना पाहायला मिळालं आहे. तिनं एक गाणं म्हटलं आहे. ते गाण तिच्या चाहत्यांच्या अधिक पसंतीला पडला आहे.  

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये प्रियाने रंगीला चित्रपटातील हाय रामा ये क्या हुआ हे गाणं शेअर केलं आहे. हे प्रियानं तिच्या आवाजात गायल्यामुळे ते तिच्या चाहत्यांच्या अधिक पसंतीस पडलं आहे. पूर्वी हे गाणं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि जॅकी श्रॉफ यांच्यावर एका चित्रपटात चित्रीत करण्यात आलं होतं. सध्या प्रियाचे इन्स्टाग्रामवर ७० लाख फॉलोअर्स असून तिने आपलं पाऊलं आता  युट्युबकडे वळवलं आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News