मराठी 'कोण होणार करोडपती'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Friday, 15 March 2019

सोनी मराठी वाहि‘कोण होणार करोडपती?’ची क्रेझनीवरील ‘कोण होणार करोडपती?’ शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे या शोचं सूत्रसंचालन करणार आहेत. नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून एक मिस्ड कॉल देऊन प्रेक्षकांना हॉटसीटपर्यंत पोहोचता येणार आहे.

विशेष म्हणजे या नोंदणी प्रक्रियेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांत दोन लाखांहून अधिक लोकांनी या शोसाठी आपलं नाव नोंदवलं आहे.

या शोप्रती प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद खरंच भारावून टाकणारा आहे. नागराज या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News