न्यायालयाने लवकरात लवकर न्याय द्यावा..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 February 2020
  • हिंगणघाट प्रकरणी पीडितेचा मृत्यू चटका लावणारा आहे. आरोपी आज मोकाट आहे.

हिंगणघाट प्रकरणी पीडितेचा मृत्यू चटका लावणारा आहे. आरोपी आज मोकाट आहे. अशा व्यक्तींना न्यायालयाने लवकरात लवकर शिक्षा द्यावी जोपर्यंत अशा व्यक्तींना शिक्षा देण्यात येणार नाही तोपर्यंत अशा घटना या होतच राहणार आहे.

ज्यावेळेस अशा व्यक्तींना त्वरित शिक्षा होण्यास सुरुवात होईल त्यावेळेस कुठेतरी अशा घटना कमी होतील असे मला वाटते. आपल्या न्यायालयामध्ये  आरोपींना लवकर शिक्षा होत नाही हेच सगळ्यात मोठी चूक आहे.  

एक प्रकारे न्यायालय बरोबर आहे, कारण की पूर्ण चौकशी करूनच कुणालाही शिक्षा देते आणि एक प्रकारे न्याय देण्यास विलंब होत असल्याने  कुठेतरी त्या व्यक्तीवर अन्याय होतो. तर माझं म्हणणं असं आहे की अशा व्यक्तींना लवकरात लवकर शिक्षा द्यावे. न्याय वेळेत झाला तर आरोपीना देखील कायद्याचा धाक राहील. 
- विजयकुमार कटारे, रुईया महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News