मुंबईत येथे फिरवा तुमच्या जोडीदाराला...

सुरज पाटील
Tuesday, 29 January 2019

मुंबई : राज्य, देश आणि परदेशात फिरण्यावरून जर सगळ्यात टॉपला नाव येत असेल, तर ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या मुंबईत..! देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक, नवविवाहीत तरूण-तरुणी, प्रेमीयूगल तसेच वयोवृध्दापर्यंत फिरण्यासाठी मुंबईत काही ठिकाणांना भेटी देत असतात. मुंबईतील तरूण, तरूणींना आणि नवख्या प्रेमविरांना देखील सगळ्यात महत्वाचा असतो एकांत. तोच एकांत तरूणपिढी मुंबईतील अशा काही ठिकाणांवर शोधत असतात, जिथे त्यांना त्य़ांच्यावर लक्ष ठेवणारे कोणीच नसते, त्य़ातीलच काही महत्वाची ठिकाणी ही तुमच्यासाठी...
 
जुहू चौपाटी

मुंबई : राज्य, देश आणि परदेशात फिरण्यावरून जर सगळ्यात टॉपला नाव येत असेल, तर ते म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या मुंबईत..! देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक, नवविवाहीत तरूण-तरुणी, प्रेमीयूगल तसेच वयोवृध्दापर्यंत फिरण्यासाठी मुंबईत काही ठिकाणांना भेटी देत असतात. मुंबईतील तरूण, तरूणींना आणि नवख्या प्रेमविरांना देखील सगळ्यात महत्वाचा असतो एकांत. तोच एकांत तरूणपिढी मुंबईतील अशा काही ठिकाणांवर शोधत असतात, जिथे त्यांना त्य़ांच्यावर लक्ष ठेवणारे कोणीच नसते, त्य़ातीलच काही महत्वाची ठिकाणी ही तुमच्यासाठी...
 
जुहू चौपाटी
मुंबईतील सांताकृझ या ठिकाणाला मिळालेल्या समुद्र काठाला जुहू चौपाटी म्हणून ओळखले जाते. वाळूतून मोकळ्या पायी फिरण्याचा आनंद तुम्हाला या ठिकाणी घेता येईल.
 
छोटा काश्मिर
देशातील काश्मिर या ठि्काणाप्रमाणेच सौंदर्याने नटलेला परिसर म्हणजे मुंबईतील छोटा काश्मिर बोटींग क्लब होय. मुंबईतील अरे मिल्क कॉलनी, गोरेगाव या ठिकाणी हा परिसर आपल्याला पाहायला मिळेल.
 
हॅंगींग गार्डन
मुंबईतील मलबार हीलच्या टोकाला असलेले फिरोजशाह मेहता गार्डन म्हणजेच हॅंगींग गार्डन होय. सुंदर बगीचा, नवेनवे प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडे हे या बागेची खास वैशिष्ट्य.

नरिमन पॉईंट
नरिमन पॉईंट हे मुंबईतील सर्वात प्रसिध्द ठिकाण. या ठिकाणी सकाळच्या मॉर्निंगवॉकपासून रात्रीच्या शतपावलीपर्यंत तरूण, तरूणींपासून जेष्ठ नागरिकसुध्दा नरिमन पॉईंटला भेट देत असतात. समुद्राच्य़ा किणारी कोणताही व्यत्यय नसताना या ठिकाणी आपन बसू शकतो.
 
मरिन ड़्राईव्ह
नरिमन पॉईंटला लागनू समुद्राच्या काठी असलेले ठिकाण म्हणजे मरिन ड़्राईव्ह. समुद्र काठी बसण्याची योग्य सोय या ठिकाणी केलेली आहे, तसेच बहुतेक कपल आपला एकांत वेळ येथेच घालवण्याचा प्रयत्न करत असतात. मरिन लाईन या रेल्वे स्थानकाहून या ठिकाणी तुम्हाला जाता येईल.
 
वरळी सीफेस
समुद्राच्याकाठी आरामदायी, एक लांबलचक आणि विस्तीर्ण सीफेस म्हणजेच वरळी सीफेस होय. त्य़ा ठिकाणी हायप्रोफाईल फॅमिलींपासून मिडलक्लास मुंबईकरांपर्यंत हजारो कपल्स इथे तासंतास बसलेले असतात. या ठिकाणी तुम्ही परळ किंवा प्रभादेवी या रेल्वे स्थानकाहून ही जावू शकता.
 
मद आयलॅंड ब्रिज
मद आयलॅंड ब्रिज हे मुंबईच्या उत्तर-पश्चिम म्हणजेच अंधेरी येथे असलेले ठिकाण. अंधेरी स्थानकापासून एक तासाच्य़ा अंतरावर हे ठिकाण अत्य़ंत रमनिय आणि निसर्गाने परिपूर्ण असे आहे.
 
वांद्रे फोर्ट
कास्टेल्ला दे अगुआड़ा म्हणजेच वांद्रे फोर्ट हे ठिकाण मुंबईतल्या वांद्रे स्थानकापासून पश्चिमेच्या दिशेने असलेला दुर्ग म्हणून ओळखला जातो. हा दूर्ग मुंबईतील सर्वात प्रसिध्द ठिकाणांपैकी एक आहे. या ठिकाणी पर्यटक, लग्र झालेली जोडपी, तसेच प्रेमी यूगलांचेही तितकेच आवडते ठिकाण म्हणजे वांद्रे फोर्ट.
  
बोरवली नॅशनल पार्क
मोठ्या जंगलातील आनंद घेण्यासाठी, वेगवेगळे प्राणी पाहाण्यासाठी आणि निसर्गातील विविध अनूभव उपभोगण्यासाठी मुंबईतील तरूण, तरूणी तसेच शहराबाहेरील पर्यटकांचा कल बोरवली नॅशनल पार्कला भेट देत असतात.
 
अशीचा काही फिरण्यासाठी ठिकाणे

  •  गेट वे ऑफ इंडिया (कुलाबा)
  •  पाम बिच रोड (बेलापूर)
  •  पांडव कडा (खारगर)
  •  मॅंगो गार्डन (बेलापूर)
  •  सरोवर विहार (बेलापूर)
  •  पार्सक हिल (बेलापूर)
  • गीरगाव चौपाटी
  •  दादर चौपाटी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News