देशाच्या उभारणीसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा: रामराजे आत्राम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 February 2020

लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने 'युवकाकडून समाजाच्या अपेक्षा' कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता.7) करण्यात आले.

लातूर: देशावर जेव्हा संकटे येतात तेव्हा तरुणाई एकत्र येवुन त्यांचा सामना करते, अशा अनेक नोंदी इतिहासात आहेत. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, मंगल पांडे, क्रांतीकारी भगतसिंग, स्वामी विवेकानंद, स्वांतत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास वाचल्यानंतर त्यांचा अभिमान वाटतो. तरुण पिढीने  न भरकटता डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करावा, नवभारताची उभारणी करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन साहित्यिक रामराजे आत्राम यांनी तरुणांना केले.

लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयामध्ये सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या वतीने 'युवकाकडून समाजाच्या अपेक्षा' कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी (ता.7) करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामराजे आत्राम बोलत होते. प्रथम रोहिणी घुणे या विद्यार्थिनीने स्वागत गीत सादर केले. राजपथावर महाराष्ट्र आणि गोव्याचे संघ व्यवस्थापक म्हणून डॉ. संतोष पाटील काम पाहिले होते, त्यामुळे त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. शिवाजीराव गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, प्रा. डॉ. रामेश्वर खंदारे, प्रा. डॉ. शिवाजीराव जवळगेकर, प्रा. डॉ. संतोष पाटील, प्रा. चैतन्य शिंदे, प्रा. डॉ. शिवशंकर कसबे, प्रा. स्फूर्ती समूद्रे, प्रा. अश्विनी धायगुडे, प्रा. बूद्रूके, प्रा. महेश सोनवणे उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. डॉ. रामेश्वर खंदारे, सूत्रसंचालन आयशा पठान, प्रमुख पाहुण्यांचा परिचय विष्णु चांदुरे तर आभार सुप्रिया पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजय पारीख, विष्णू चांदूरे, मनोज आत्राम, हणमंत चिंचोले, भरत पवार, सुकेश अकिनगिरे, करण राठोड, शिवाजी पांचाळ आणि सामाजिकशास्त्र आभ्यास मंडळाचे सर्व पदाधिकरी यांनी परिश्रम घेतले. 

तरुण म्हटलं की 'लाथ मारेल तिथे पाणी काढण्याची धमक असते, त्यांच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाला तलवारी धार असते, तरुणाईवर देशाचा विकास आवलंबुन आहे. तरुणाईच्या खांद्यावर देशाच्या विकासाची स्वप्ने पाहिली जातात, मात्र सोशल मीडिया आणि आंमली पदार्थ्यांच्या आहारी तरुणाई जात आहे. दहा पैकी दोन तरुण नशेच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे तरुणाईने भविष्याचा विचार करावा आणि जबाबदारीचे भान ठेवुन आचरण करावे
- डॉ. शिवाजीराव गायकवाड,
प्र. प्राचार्य, दयानंद कला महाविद्याल, लातूर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News