आयपीएलमध्ये पगारकपात ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020

तरुणाईच्या मनोरंजनाचा तथा जिव्हाळ्याचा विषय असणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा ही नेहमीच कुतूहलाचा विषय असते

मुंबई : तरुणाईच्या मनोरंजनाचा तथा जिव्हाळ्याचा विषय असणारी आयपीएल क्रिकेट स्पर्धा ही नेहमीच कुतूहलाचा विषय असते. या कुतुहलामागचे कारण आयपीएल स्पर्धेच्या अवतीभोवती असलेले ग्लॅमर,आयपीलच्या आजूबाजूला असलेले चमकणारे वातावरण,या स्पर्धेचा भव्यतेचा लोकांना वाटणारा हेवा, या स्पर्धेची दिव्यता टिकवून ठेवण्यासाठी करण्यात येणारी पैशाची उधळपट्टी,पाण्यासारखा वाहणारा आर्थिक स्रोत,खेळाडूंना मिळणारे गलेलठ्ठ मानधन, आयपीलचे स्टारडम  जपण्यासाठी वेगवेगळ्या सिनेतारकांचे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम,मात्र या सगळ्यावर आता कात्री लागते की काय अशी शंका उदभवू लागली आहे.

या मागचे कारण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने घेतलेला आथिर्क निर्बंधाबाबतचा निर्णय.  

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपील स्पर्धेच्या विजेता आणि उपविजेता संघाच्या मानधनामध्ये कमालीची घट केली आहे. या पूर्वी विजय संपादीत  करणाऱ्या संघाला थोडे-थोडके नाही तब्बल २० कोटी रुपये रक्कम ही  बक्षिसाच्या स्वरूपात दिली जायची तर उपविजेत्या संघाला १२.५ कोटी रुपये दिले जायचे. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील विजय मिळवणाऱ्या संघाला ४ कोटी ३० लाख रुपयांचे बक्षीस दिले जायच. 

मात्र या सर्व रकमेला आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने मोठ्या प्रमाणावर कात्री लावायची ठरवली आहे. आयपीएल च्या आगामी हंगामापासून या सर्व मानधनामध्ये ५० टक्क्यापेक्षा जास्त रक्कम कपात करण्याचे ठरवले आहे.आयपीएलच्या आगामी पर्वापासून विजेत्या संघाला १० कोटी रुपयांवर समाधान मानावे लागेल तर उपविजेत्या संघाच्या पदरी ६ कोटी २५ लाख रुपये पडणार आहेत. तर राज्य क्रिकेट असोशियनला प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यात येतील ज्यामध्ये बीसीसीआयकडून ५० लाखांचा वाटा  असेल 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News