भ्रष्टाचारामुळे जनतेची फसवणूक होत आहे का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • सर्व शासकीय कार्यालयाबाहेर लाचलुचपक प्रतिबंधक विभागाचा हेल्प लाईन नंबर प्रदर्शनी भागात लावण्यास सांगीतले. आज बहुतांश कार्यालयात हे नंबर दिसतात, तरी देखील सर्रास भष्टाचार होत आहे

मुंबई : भ्रष्टाचाराची किड शासकीय आणि खाजगी दोन्ही क्षेत्राला लागली. संपुर्ण देश पोखरुन खाण्याच काम ही कीड करत आहे. भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी देशात विविध आंदोलने झाली. चळवळी उभ्या राहील्या, कालांतराने ही चळवळ भ्रष्टाचाराने बरबटली गेली, त्यामुळे चळवळ स्थगीत करण्यात आली. शासनाने भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी कठोर पावले उचलली, सर्व शासकीय कार्यालयाबाहेर लाचलुचपक प्रतिबंधक विभागाचा हेल्प लाईन नंबर प्रदर्शनी भागात लावण्यास सांगीतले. आज बहुतांश कार्यालयात हे नंबर दिसतात, तरी देखील सर्रास भष्टाचार होत आहे, 'भ्रष्टाचारामुळे जनतेची फसवनुक होत आहे का?' या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

भ्रष्टाचार हा आपल्या देशाला लागलेली कीड आहे. जिकडे बघावं तिकडे भ्रष्टाचाराचे स्तोम माजले आहे. सर्वात जास्त भ्रष्टाचार हा राजकारणात दिसून येतो. भ्रष्टाचार हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. हे राष्ट्रासाठी  व समाजासाठी अत्यंत घातक आहे. सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार पाहावयास मिळत आहे. क्रीडा, साहित्य, संस्कृती, राजकारण, अश्या अनेक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. बरेच अधिकारी लाच घेतल्याशिवाय काम करत. ग्रामीण भागातील गरीब लोकांना याचा जास्त त्रास सहन करावा लागतो. पैश्याच्या लोभापायी  अनेकांनी आपला स्वाभिमान, इमानदारी विकून खाल्ली. भ्रष्टाचारामुळे देशातील 90 टक्के जनता गरीब आहे. देशातील बऱ्याच लोकांकडे राहायला घर नाही. पिण्यासाठी पाणी नाही. रस्ते जरी बनवले तर ते निकृष्ट दर्जाचे असतात. मग तिथेही भ्रष्टाचार आलाच. देशाचा कारभार हा सुरळीत चालवणे हे सरकारचे कर्तव्य असते. जर सरकार भ्रष्टाचारी असेल तर देशाची प्रगती कशी होईल.
- कृष्णा गाडेकर

भ्रष्टाचारासाठी सरकार आणि नेत्याला जबाबदार ठरवणे चुकीचे आहे, कारण त्यात आपला पण सहभाग तेवढाच असतो, आता ट्रॅफिक पोलिसांची गोष्ट घ्या, तो पैसे मागत नसेल तरी आपण जबरदस्ती त्यांना पैसे देतो, घ्याना सर, सोडा ना सर, जाऊद्या ना सर, आता सांगा यात कोण भ्रष्टाचारी आहे, १०० पैकी केवळ १ ते २ टक्के लोक प्रामाणिक मिळतील जे पूर्ण शुल्क भारतात, बाकी तर रीश्रत देतात, समोरचा व्यक्ती घेत नसेल तरी जबरदस्ती देतात, खर तर अगोदर आपल्याला सुदरायला पाहिजे आणि मगच सरकारवर आक्षेप केला पाहिजे, जर आपणच भ्रष्टाचाराच्या पाण्यात आहोत तर सरकारवर बोट दाखवण्याचा काहीही अधिकार आपल्याला नाही
- अजिक्य भालेराव

भ्रष्टाचार हा देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे कारण यात सामान्य जनतेची फसवणूक होते. लाच घेणारा आणि देणारा दोघेही अपराधी आहेत. यामुळे गरजू लोकांपर्यंत योजनेचा लाभ पोहचत नाही तसेच योग्य उमेदवारांचे selection होत नाही. भ्रष्टाचारामुळे कायद्याची पायमल्ली केली जाते. रस्ते पूल निकृष्ट दर्जाचे बांधले जातात. साद्या पिऊन पासून तर मोठे मोठे अधिकारी भ्रष्टाचार करतात. गोर गरीब जनतेनी भरलेला टॅक्सचा त्यांच्या विकासासाठी उपयोग केला जात नाही.
- प्रतिक भालेराव

होय भ्रष्टाचारामुळे जनतेची फसवनुक होत आहेत. सरकारने ठरवून दिलेले दैनंदीन भोजन विद्यार्थ्यांना वसतिगृहात मिळत नाही. निकृष्ट दर्जाचे जेवन मिळते, ही विद्यार्थ्यांची फसवणूक आहे. वसतीगृह प्रशासन आणि अधिकारी यांना अन्नाच्या दर्जाची संपुर्ण माहिती असते, मात्र भोजनाचा ठेका घेताना अधिकाऱ्यांना काही पैसे द्यावे वागतात त्यामुळे ते पैसे भरुन काढण्यासाठी कमी दर्जाचे अन्न विकत घेताता आणि विद्यार्थ्यांना घ्यायला घालतात असा प्रकारे जनतेची साफ फसवनूक केली जाते.
- रुपेश गायकवाड

यंदा शेतकऱ्यांना महामंडळाने निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाने दिले. शेतकऱ्यांनी पेरणी केल्यावर सोयाबीन उगवले नाही, बहुतेक हे बियाने जुने असेल त्यांच्यावर प्रक्रीय न करता शेतकऱ्यांना वाटप केले असावे, यामागे मोठा भष्टाचार असू शकतो कारण शिल्लक असलेले बियाने नव्याने खरेदी केले असे दाखवायचे आणि बिले लाटायची त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांची ही साफ फसवणूक आहे.
- दत्ता जाधव

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News