कोरोनावर लस उपलब्ध; 32 वर्षीय तरुणीवर केला पहिला प्रयोग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 April 2020

32 वर्षीय तरुणीवर कोरोना अॅन्टी व्हायरस लसीचा पहिली प्रयोग शुक्रवारी (ता. 24) ऑक्सफर्ड विद्यापीठात करण्यात आला. 

ब्रीटन :  संपुर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट पसरले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. 80 पैक्षा अधिक देशात कोरोनावर संशोधन सुरु आहे. मात्र, सध्यातरी कोरोना व्हायरसवर कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे नारिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशा वेळी एक आशेचा किरण समोर आला. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांना कोरोनावर लस शोधून काढण्यात येत आले. 32 वर्षीय तरुणीवर कोरोना अॅन्टी व्हायरस लसीचा पहिली प्रयोग शुक्रवारी (ता. 24) ऑक्सफर्ड विद्यापीठात करण्यात आला. 

यापुढे 800 स्वयंसेवकांचा लसीकरणासाठी ट्रायल केला घेतला जाणार आहे. त्यासाठी तरुणाईने उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला आहे. या आधी अमेरीका आणि चिन या दोनी देशांनी कोरोना अॅन्टी व्हायरसचे मानवी ट्रायल सुरु केले. मात्र, दोन्ही देशांना अद्याप संपुर्ण यश आले नाही. त्यामुळे सर्वांते लक्ष आता ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीकडे लक्ष लागले आहे. एखाद्या विषाणूवर लस तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात. मात्र, ऑक्सफर्ड विद्यापीठाने फक्त 3 महिन्यात कोरोनवार लस तयार केली. 

कोरोना लसीकरणाच्या ट्रायलसाठी ब्रीटचे 800 स्वयंसेवक तयार झाले आहेत. यात 18 ते 55 वयाच्या नागरिकांचा समावेश आहे. सध्या 800 स्वयंसेवकापैकी 50 टक्के स्वयंसेवाकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. त्यानंतर इतर व्हॅलेंटीअर्सना वेगळ- वेगळी लस दिली जाईल. कोणत्या व्हॅलेंटीअर्स कोणती लस दिली यांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. ही लस कोनोला व्हायरसला मारण्यासाठी प्रभावी काम करेल. ही लस जोपर्यंत प्रभावी काम करणार नाही तो पर्यंत रुग्णांवर याचा वापरता येणार नाही असे मत ऑक्सफर्ड विद्यापीठातील जोनर इंस्टीट्यूटच्या प्रा. सारा गिलबर्ट यांनी एक वृत्तसंस्थेला सांगितले. मानवी परीक्षण यशस्वी झाल्यानंतर ही लस काही दिवसात उपलब्ध होणार आहे. आक्टोंबर पर्यंत 10 लाख लस तयार केल्या जातील असा अंदाज विद्यापीठाने व्यक्त केला.

सध्या कोरोना लसीची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे, ज्या स्वयंसेवकांना लस देऊन ट्रायल करण्यात आले. त्यांना कोरोना संक्रमीत का केले जात नाही? असा प्रश्न अनेक वेळा विचारला जात आहे. आम्हीला कोणात्याही स्वयंसेवाकाच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार नाही, त्यामुळे स्वयंसेवाकांना लस देऊन कोरोन संक्रमीत करणे योग्य नाही. स्वयंसेवाकांचा जीव धोक्यात न टाकता आनखी काही नागरिकांवर ही लस ट्रायल केली जाणार आहे असे मत ऑक्सफर्ड लसीकरण समुहाचे निर्देशक प्रा. एंड्यू पोलार्ड यांनी सांगितले.

कशी काम करतो कोरोना लस

कोरोना व्हायरसचा एक जीन घेऊन प्राईस प्रोटीनद्वारे दुसऱ्या धोकादायक व्हारसमध्ये टाकण्यात आला. त्यापासून एक लस बनवण्यात आली. ही लस स्वयंसेवाकांना दिल्यानंतर त्यांच्या शरीरातील कोषीतेक जावुन प्रोटीन तयार करते. त्यामुळे कोरोना व्हायरसला लठणारी रोग प्रतिकारशक्ती स्वयंसेवाकांच्या शरीरात तयार होतो. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा संसर्ग झाला तरी अशा व्हायरसला शोधून त्यांचा खात्मा करते. 

"मी एक वैज्ञानिक आहे. त्यामुळे वैज्ञानिकांना सहाय्य करण्याचा प्रयत्न करत आहे. मी कोरोना व्हायसचा अभ्यास केला नाही मात्र, कोरोना व्हायसरवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांची मदत करण्याची इच्छा आहे, त्यामुळे मी कोरोना व्हायसरच्या ट्रायलला स्वत:हून तयार झाले, ट्रायल दिल्यानंतर मला खुप आनंद वाटतोय.  
-एविसा ग्रानाटो, मायक्रो बॉयलाजिस्ट, ट्रायल वॉलंटीयर, 32 वर्षीय तरुणी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News