कोरोनावार प्रभावी औषध सापडल; भारतात उत्पादन होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 June 2020

"रेमडेसिवीर'चे उत्पादन भारतात होणार असून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे.

मुंबई : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर अद्याप औषध आलेले नाही. मात्र, "रेमडेसिवीर' हे औषध कोरोना विषाणूवर प्रभावी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. दरम्यान, आता भारतात "रेमडेसिवीर'चे उत्पादन घेण्यास, विकण्यास दोन कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे.

"रेमडेसिवीर'चे उत्पादन भारतात होणार असून ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने या रेमडेसिवीर औषधाच्या उत्पादनासाठी हेटेरो आणि सिप्ला या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. शनिवारी रात्री ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला. दरम्यान, रेमडेसिवीर हे औषध महाराष्ट्र सरकारलाही हवे होते. त्यासाठी बांगलादेशातून त्याची आयात करण्यात येणार होती. मात्र, काही कारणांमुळे ही आयात थांबवण्यात आली आहे. आता या औषधाचे भारतातच उत्पादन होणार असल्याने कोरोनाच्या संकटात दिलासादायक बातमी दिली आहे.

सोमवारी (ता.22) रेमडेसिवीरबाबतची कागदपत्रे सरकारकडे सोपवली जाणार आहेत. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने भारतातील दोन कंपन्या हेटेरो आणि सिप्ला यांना याबाबतची परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मागणी केली जाणार आहे. त्यानुसार राज्यात लवकरच रेमडेसिवीरची क्‍लिनिकल ट्रायल केली जाईल.

- डॉ. आकाश खोब्रागडे, राज्य समन्वय अधिकारी, रेमडेसिवीर ट्रायल स्टेट कमिटी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News