कोरोनाच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी तरूणांनी मासे विकले.

महेश घोलप
Thursday, 20 August 2020

कोरोनाच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी तरूणांनी मासे विकले.

कोरोनाच्या काळात उदरनिर्वाह करण्यासाठी तरूणांनी मासे विकले.

सांगली - अतिवृष्टी झाल्यानंतर नदीचं पाणी पात्राच्या बाहेर येतं, याचा फायदा अनेक तरूण मासे मारण्यासाठी करतात. कोरोनाच्या काळात घरी असलेल्या अनेक तरूणांनी धाडस करून खाण्यासाठी मासे पकडले. त्याचबरोबर अनेक तरूणांनी पूराच्या पाण्यात सापडलेले मासे लोकांना विकून पैसे कमावले. कोरोनाच्या काळात हा नवीन व्यवसाय तरूणांना सुचल्याने ते आनंदीत आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीच्या काळापासून चांदोली धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे पाण्याने अर्धवट असलेलं धरण पुर्णपणे भरलं.  चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. सोडलेल्या पाण्यातून मासे पाण्याच्या प्रवाहासोबत पाण्यात उतरले. त्याचा फायदा अनेक तरूणांनी घेत मासे पकण्यास सुरूवात केली.

पकण्यात आलेले मासे चविष्ट असल्याने तरूणांनी विकण्याचा निर्णय घेतला. मासे दोन ते तीन किलोच्या वजनाचे सापडले, त्यामुळे तरूणांनी रास्त भाव ठरवून मासे विक्री केली. तसेच अनेक तरूणांनी पाण्यासोबत शेतात आलेली खेकडी पकडायला सुरूवात केली. खेकडी सुध्दा रास्त भावाने विकली असल्याचे तुकाराम नेर्लेकर यांनी सांगितले.

पुराच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी जात असताना तरूणांनी टायर मधील इंनरचा वापर केला. इंनरचा वापर केल्याने अधिक पाण्यात जाऊन मासे पकडता आले असे एक तरूण सांगत होता. शेतात पुराच्या पाण्यासोबत आलेले मासे अजून शेतात आहेत, ते पकडण्याचं काम तरूण करत आहेत. तसेच रास्त भावात ते विकत सुध्दा आहेत.

कोरोनामुळे रोजगार नसल्याने मासे पकडणे हे एकमेव साधन उरलं होतं. त्यामुळे मी आणि माझ्या मित्रांनी सुरूवातीला घरी खाण्यासाठी मासे पकडले. त्यानंतर अधिक मासे सापडत असल्याने मासे पकडून विकण्याचा निर्णय घेतला. - संतोष वाघमारे

मे महिन्यापासून गावाकडं राहिलेला तरूण रोजगाराच्या शोधात होता. परंतु गावाच्यावेशीवरून जात असलेल्या वारणामाई त्यांना पावली असं म्हणायला हरकत नाही. वारणा नदीतील मासे पकडून अनेकांनी आपलं उदरनिर्वाह केला - निलेश पाटील

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News