दक्षिण आशियातील एकमेव एटीपी स्पर्धा कोरोनाच्या विळख्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 17 May 2020

टाटा ओपन महाराष्ट्र ही दक्षिण आशियातील एकमेव एटीपी स्पर्धा आहे. स्पर्धेचा तिसरा मोसम 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झाल होता

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाचा परिणाम एटीपी स्पर्धा कार्यक्रमावरही झालेला आहे. परिणामी पुण्यात होत असलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेवरही होण्याचे सूतोवाच स्पर्धा संचालक प्रशांत सुतार यांनी केले आहे.

टाटा ओपन महाराष्ट्र ही दक्षिण आशियातील एकमेव एटीपी स्पर्धा आहे. स्पर्धेचा तिसरा मोसम 3 ते 9 फेब्रुवारी दरम्यान पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झाल होता. जगभरात होत असलेल्या स्पर्धा संचालकांसह जागतिक टेनिस संघटना आणि एटीपी सातत्याने चर्चा करत आहेत. सर्वच जण टेनिस पुन्हा सुरू करण्याची आशा व्यक्त करत आहेत, अशी माहिती सुतार यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News