कोरोनाचा प्रादुर्भाव अर्थव्यवस्थेवरही, केलं 'इतकं' कोटींचं नुकसान...

सकाळ यिनबझ
Tuesday, 3 March 2020

अमेरिकेच्या 'अमेरिका मार्केट डाऊ जोन्स'मध्ये १२ टक्क्यांनी घसरण झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे २००८ च्या मंदीनंतरच सर्वाधिक फटका कोरोनाने गुंतवणूकदारांना तसेच अब्जाधीशांना दिला आहे. 

मुंबई : चीनमधील वुहान शहरातून प्रसारित झालेला कोरोना व्हायरस जगभरात आपले पाय पसरतो आहे. जगभरातील ५० पेक्षा अधिक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने 'जागतिक आणीबाणी' देखील घोषित केली होती तर चीनने कोरोनाला आळा घालण्यासाठी अगदी १० दिवसांमध्ये १००० बेडचे हॉस्पिटल उभारले आहे, मात्र कोरोना व्हायरस काही थांबायचं नाव घेत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्थ रुग्णांची संख्या वाढतच आहे. आलेल्या आकडेवारीनुसार ९० हजारहून अधिक कोरोनाग्रस्थ रुग्ण सध्या जगभरात आहेत. भारतात या रुग्णांची संख्या ५ वर आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी आणि यावर उपाय शोधात यावा यासाठी अनेक अब्जाधीशांनी पुढाकार घेतला होता.

याची बातमी तुम्ही सविस्तर वाचू शकता - कोरोनाला हरवण्यासाठी केली 'या' मोठ्या श्रीमंतानी मदत

मात्र आता कोरोना विषाचे जाळे अर्थव्यवस्थेवर देखील होतानाचा पाहायला मिळत आहे. सेनेक्समध्ये इतिहासात दुसर्यांदा मोठी घसरण झाली आहे. बाजारात १४४८ इतक्या अंकांची ही घसरण आहे, तर अमेरिकेच्या 'अमेरिका मार्केट डाऊ जोन्स'मध्ये १२ टक्क्यांनी घसरण झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे २००८ च्या मंदीनंतरच सर्वाधिक फटका कोरोनाने गुंतवणूकदारांना तसेच अब्जाधीशांना दिला आहे. 

काही अब्जाधीश आणि त्यांचं कोरोनामुळे झालेलं नुकसान - 

  • जेफ बेजोस : १२ अरब डॉलर्स
  • मार्क झुकेरबर्ग : ७ अरब डॉलर्स
  • एलन मास्क : ६.८ अरब डॉलर्स 
  • वॉरेन बफेट  : ६.१ अरब डॉलर्स
  • बिल गेट्स : ५.७ अरब डॉलर्स

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News