कोरोनानंतरची शिक्षण पद्धती अशी असावी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 1 September 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • शिक्षण व्यवस्थेत आणखी काही बदल अपेक्षित आहेत अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या

मुंबई : कोरोनामुळे देशातील शिक्षण व्यवस्था बदलून गेली. तंत्रज्ञानाने शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल केले. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी तंत्रस्नेही झाले. ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षणात कधीही तंत्रज्ञानाचा वापर केला नाही, असे विद्यार्थी थेट ऑनलाईन अभ्यास करताना दिसतात. कोरोनानंतरची शिक्षण पद्धती अशी असावी? या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेत आणखी काही बदल अपेक्षित आहेत अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. त्यातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

कोरोनामुळे शिक्षणपद्धतीत फार मोठा बदल झाला. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन सरकारने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शासनाने मुलांना ऑनलाईन शिकवण्याचा निर्णय घेतला. बहुतांश मुलाकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल नाही. ऑनलाईन शिक्षण मुलांच्या लक्षात राहत नाही. काही मुलांनी आत्महत्या पण केल्या. येत्या काही काळात शिक्षण क्षेत्रात फार मोठे आमूलाग्र बदल होतील.
- कृष्णा गाडेकर

शिक्षण म्हटल की शिक्षक, वर्ग, फळा, पेन, पुस्तक, वही, नियोजिक वेळ अस दृष्य विद्यार्थ्यासमोर येते, मात्र कोरोनमुळे ही संपुर्ण शिक्षण पद्धतीच बदलून गेली. आता शाळा, महाविद्यालयात जाण्याची गरज राहिली नाही. घरी बसून किंवा इतर ठिकाणी राहूनही शिक्षण घेण्याची सोय तंत्रज्ञानामुळे विकसीत झाली. ही बदलाची सुरुवात आहे आणखी अमुलाग्र बदल शिक्षण व्यवस्थेत होतील. कोणत्याही विषयात दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदव्युत्तर शिक्षण झाले तरी दुससऱ्या शाखेत शिक्षण्याती संधी भविष्यात विद्यार्थ्यांना मिळावी. उदा. आर्टच्या विद्यार्थ्यांना सायन्सचे शिक्षण घेण्याची संधी भविष्यात निर्माण व्हावी.
- रुपेश गायकवाड

दरवर्षी विद्यार्थ्यांना शिक्षण संस्था किंवा विद्यापीठ बदलण्याची परवाणगी मिळावी, त्यांमुळे विद्यार्थ्यांना वाटेल त्या विद्यापीठात शिक्षण देऊन आपली इच्छा पुर्ण करता येईल.
- गजानन कोल्हे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News