पवईत फुटली कोरोनामुक्तची हंडी

प्रतीक कांबळे
Wednesday, 12 August 2020
  • आज दहीकाला उत्सव मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना  कोरोनामुळे याही उत्सवावर विरजण पडले आहे.त्यामुळे 4 ते ७ थर लावणारे गोविंदा पथकांनी यंदा साधेपणाने दहिकाला उत्सव साजरी करण्याचे ठरवले आहे.

मुंबईः आज दहीकाला उत्सव मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरी होत असताना  कोरोनामुळे याही उत्सवावर विरजण पडले आहे.त्यामुळे 4 ते ७ थर लावणारे गोविंदा पथकांनी यंदा साधेपणाने दहिकाला उत्सव साजरी करण्याचे ठरवले आहे.   पवईतही अशीच काही परिस्थिती असताना प्रभाग क्रमांक १२१  मधील शिवसेनेचे शाखाप्रमुख मनिष नायर यांच्या संकल्पनेतून कोरोनामुक्त दहीहंडी यंदा साजरी करण्यात आली. 

 

दरवर्षी लक्षवेधी दहीहंडी पवईतील मोरारजी नगर येथे आयोजित केली जाते. दरम्यान सलामी देण्यास आलेल्या पथकास थर नुसार बक्षीसे स्मरणचिन्हे देण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच महासंकट असताना सरकारच्या नियमांच्या आधीन राहून आम्ही कोरोना मुक्त दहिहंडी साजरी करत असल्याचे शिवसेनेचे मनिष नायर यांनी सांगितले. 

पवईतील मोरारजी नगर येथे ही दहीहंडी बांधण्यात आली असून लहान चिमुकल्यांकडून ही हंडी फोडण्यात आली यावेळी स्थानिक नगरसेविका चंद्रावती मोरे हे ही उपस्थित होते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News