मराठवाडा विद्यालयाचे कोरोना वॉरियर्स

यिन बझ
Thursday, 5 November 2020

जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचे सहाय्यक म्हणून आपले विद्यार्थी काम करत आहेत.साधारण १०४७ दिव्यांग विद्यार्थी आहेत यांना परीक्षा काळात सहाय्यक म्हणून मदत करणार आहेत.प्रशासन आमच्या पाठीशी आहे.मला सांगायला आनंद होतो कि मागच्या वर्षीचा आमच्या विद्यापीठाला शासनाचा उत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार मिळाला .

औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठाचे संचालक टी.आर. पाटील यांनी कोरोनाच्या काळातील एनएसएस चे योगदानकार्य यिनबझ सोबत शेअर केले.पाटील यांनी सांगितले. कि त्यांच्या महाविद्यालयामध्ये एनएसएसचा कार्यक्रम अधिकारी ही जबाबदारी त्यांच्यावर होती ते म्हणाले कि,माझ्यामध्ये सामाजिक दृष्टीकोन असल्याने मला हे काम करता आले,यामध्ये कॅम्प घेणे, आपत्ती व्यवस्थापन, वृक्षारोपण केले.या वर्षी कोविड -१९ च संकट आहे, यात औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने एक डिझास्टर नामक सेल तयार केला.यात कार्यक्रम अधिकारी आणि चार विध्यार्थी या सेलला जोडून कॉल अटेंड करायचे, आणि जर कोणाला अन्नधान्याची गरज वाटली तर त्या प्रमांणे त्यांची सोय आम्ही करतअसू .

लॉकडाऊन असल्यामुळे काही लोक बाहेर गावी जाण्यासाठी विनंती करत होते. त्यानं मदत केली. काहींना औषधाची गरज होती, पण ते लोक बाहेर पडू शकत नव्हते, त्यावेळी आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी स्वतः खिशातील पैसे देऊन,त्यानां घरी औषध पोहचवली.ज्याला गरज आहे तिथं पर्यंत पोहचण्यासाठी हि यंत्रणा काम करत होती.विदयार्थ्यांनी आपल्या गावामध्ये मास्क, सॅनिटायझर,आम्ही तयार केलेले किट वाटण्याचे काम केले.

विद्यापीठामध्ये मास्क बनवण्याची परमिशन घेतली आणि आम्ही कार्यशाळा घेऊन ८० विध्यार्थी आणि कर्मचारी यात सामील होते.कोरोनाचे नियम पाळण्यासाठी व जनजागृतीसाठी एक पुस्तिका तयार केली. इ-मीडियाचा वापर करून लोकांपर्यंत पोहचवण्याचं काम आम्ही केले.याकाळात बँकांच्या ठिकाणी खूप गर्दी होत होती.त्यावेळी आपल्या स्वयंसेवकांनीं तिथे जाऊन सोशल डिस्टंसिन्गचे नियम लोकांनां सांगितले.एनएसएसच्या विध्यार्थी कधी घाबरले नाहित, आत्मविश्वास बळकट करून लोकांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे आले.मुलांना या सर्व कामातूनही त्यानां आनंद मिळत होता.यातूनच चांगला विद्यार्थी हा घडत जातो.

यादरम्यान जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांचे सहाय्यक म्हणून आपले विद्यार्थी काम करत आहेत.साधारण १०४७ दिव्यांग विद्यार्थी आहेत यांना परीक्षा काळात सहाय्यक म्हणून मदत करणार आहेत.प्रशासन आमच्या पाठीशी आहे.मला सांगायला आनंद होतो कि मागच्या वर्षीचा आमच्या विद्यापीठाला शासनाचा उत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार मिळाला .

मला देखील महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संचालक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.हि आमच्या केलेल्या कामाची पावती आहे.मीडिया हि आमच्या सोबत आहे.तुम्ही सुद्धा आमची मुलाखत घेऊन विद्यापीठाचा मान वाढवत आहात.याकरता मी आमच्या विद्यापीठाच्या वतीने आणि कुलगुरूंच्या वतीने आभार मानतो.

 

 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News