कोरोना व्हायरसच्या भितीने लग्नात मास्क घालूनच केला किस...

यिनबझ टीम
Tuesday, 25 February 2020

गेल्या दीड महिन्यापासून जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र या थैमानाला घाबरून लग्न तर थांबवता येणार नाही आणि सगळ्यात भारी किस्सा म्हणजे इथे लग्नात एकमेंकांना लिप किस करायची परंपरा आहे. आता करायचं काय?

फिलिपीन्स - गेल्या दीड महिन्यापासून जगभर कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मात्र या थैमानाला घाबरून लग्न तर थांबवता येणार नाही आणि सगळ्यात भारी किस्सा म्हणजे इथे लग्नात एकमेंकांना लिप किस करायची परंपरा आहे. आता करायचं काय?

फिलिपीन्समध्येदेखील अशीच एक अडचण निर्माण झाली होती. एकदम 200 जोडींचा लग्न समारंभ आयोजित केला होता. लग्नानंतर किस घेण्याची इथे प्रथाच असते. पण जेव्हा फिलिपिन्समध्ये २०० हून अधिक जोडप्यांनी लग्न केले तेव्हा त्यांनी एकमेकांना असे किस केले की थेट त्याची बातमीच झाली. 

गेल्या एका महिन्यापासून, जग कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे, त्यामुळे ते टाळण्यासाठी लोक मास्क घालत आहेत. जेव्हा या जोडप्यांचे फिलीपिन्समध्ये लग्न झाले तेव्हा त्यांनीही असेच मास्क घातले होते. मात्र आता किस करण्याची प्रथा कशी काय चालवायची. आता ही प्रथादेखील पूर्ण करावी लागेल आणि कोरोना विषाणू देखील टाळायला हवा. तर या जोडप्याने मास्क घालूनच एकमेकांना किस सुरूवात केली आणि तिथले फोटो ट्रेंडिंगचा विषय बनले.

लग्नाआधी या जोडप्यांकडून त्यांच्या आरोग्याविषयी आणि शेवटच्या 14 दिवसांच्या भेटींविषयी संपूर्ण माहिती घेण्यात आली होती. ग्रेट हॉलमध्ये सर्व जोडपे एकत्र जमले आणि बैकॉलॉडचे मेयर Evelio Leonardia यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News