कोरोना संशयित तरूणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, मग झालं असं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 30 July 2020

त्यानंतर भावाने बडनेरा पोलिस ठाणे गाठलं आणि झालेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. ताब्यात घेतलेला आरोपी अल्पेश देशमुख वरती विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

कोरोना संशयित तरूणीच्या गुप्तांगातून घेतला स्वॅब, मग झालं असं...

अमरावती - कोरोनाने अवघ्या देशाला ग्रासलं आहे. अनेकजण कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीने वारंवार टेस्ट करत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ वर्षीय तरूणीचा कोविड सेंटरमध्ये गुप्तांगातील स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावरती बलात्कारासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अल्पेश अशोक देशमुख असं आरोपीचं नाव असून तो लॅबमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतो. 

२४ वर्षीय तरूणी परिसरातील एका मॉलमध्ये नोकरी करते, त्याचबरोबर ती भावासोबत राहायला आहे. काम करत असलेल्या ठिकाणी एका सहका-याला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. त्यानंतर संपुर्ण सहका-यांची कोरोना चाचणी करण्याचे ठरले. २० सहका-यांचे ट्रामा केअर टेस्टिंग लॅबमध्ये स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर आरोपी देशमुखने संबंधित मुलीला तुमची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तुम्हाला युरिनल तपासणी करावी लागेल असे सांगितले. तरूणीने हा सगळा प्रकार वरिष्ठ सहका-यांना सांगितला. त्यानंतर दोघींनी लॅबमध्ये महिला कर्मचारी आहे का ? अशी विचारणा केली. देशमुखने नाही म्हणून सांगितले. पण येताना तुम्ही महिला सहका-याला घेऊन येऊ शकता असे सांगितले. 

त्यानंतर टेक्निशियनने तरूणीच्या गुप्तांगातील स्वॅब टेस्ट झाल्यानंतर कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे सांगितले. झालेल्या चाचणीबाबत सगळा प्रकार तरूणीने भावाला सांगितला. भावाने डॉक्टरांना विचारणा केली, की अशी टेस्ट करणे गरजेचे असते का ? डॉक्टरांनी काहीचं गरज नसल्याचे सांगितले. त्यानंतर भावाने बडनेरा पोलिस ठाणे गाठलं आणि झालेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला. ताब्यात घेतलेला आरोपी अल्पेश देशमुख वरती विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

घडलेला प्रकार निंदणीन आहे. अशापध्दतीने कुठेचं स्वॅब घेतला जात नाही, हा अत्याचाराचा प्रकार आहे. आरोपीवरती गुन्हा दाखल करून अटक केली आहे. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News