उपचारानंतरही कोरोना फुफ्फुसांमध्ये लपून राहतो?; चिनी संशोधकांनी केला दावा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 1 May 2020

देशासह जगाभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, त्यासाठी जगातील कोरोनाविषयी वेगवेगळ्या भागात संशोधन व अभ्यास केले जात आहेत.

देशासह जगाभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, त्यासाठी जगातील कोरोनाविषयी वेगवेगळ्या भागात संशोधन व अभ्यास केले जात आहेत. आता एका नवीन संशोधन अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कोरोनावर उपचारानंतरही हा विषाणू फुफ्फुसांमध्ये बराच काळ लपून राहू शकतो.

चिनी संशोधकांच्या मते, रूग्णालयातून बाहेर पडल्यानंतर अडीच महिन्यांनीही रुग्ण पॉजिटीव्ह आढळले. दक्षिण कोरियामध्येही बरेच लोक उपचारानंतरही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. चीन आणि दक्षिण कोरिया व्यतिरिक्त तैवान, व्हिएतनाम आणि इतर देशांमध्येही अशीच प्रकरणे नोंदवली गेली आहेत. संशोधकांच्या म्हणण्यानुसार नमुना तपासणीसाठी फुफ्फुसांच्या खोलीपर्यंत नेला जात नाही, त्यामुळे बऱ्याचदा रिपोर्ट निगेटिव्ह येतो. 

...म्हणून रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह 
चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार, कोरोना विषाणू फुफ्फुसात खोलवर आढळू शकतो. तपासणीसाठी नमुना घेताना असे होऊ शकते की ते पकडले जाऊ  शकत  नाही आणि त्यामुळे रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत. कोरिया नियंत्रण व रोग प्रतिबंधक केंद्राचे संचालक जोंग युन यांच्या मते, रुग्णाला पुन्हा संसर्ग होण्याऐवजी कोरोना विषाणूची पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता जास्त आहे.

एका महिलेच्या मृत्यूने खुलासा
चीनच्या आर्मी मेडिकल सायन्स युनिव्हर्सिटीचे संशोधन प्रमुख डॉ. बियान शिबुू म्हणतात की, एका 78 वर्षीय महिलेची चीनमध्ये तीन वेळा कोरोना  तपासणी केली गेली. त्यावेळी तिन्ही वेळा तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर थोड्या दिवसांनी पुन्हा ती महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. २७ जानेवारीला या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आणि दुसर्‍याच दिवशी दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला होता. मात्र  १३ फेब्रुवारीला तिला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात ती मरण पावली. 

फुफ्फुसांमध्ये खोलवर आढळू शकतो विषाणू 
या महिलेच्या मृत्यूनंतर पोस्टमॉर्टम केले असता, डॉक्टरांना तिच्या यकृत, हृदय किंवा आतड्यात कोरोना विषाणू आढळला नाही, परंतु फुफ्फुसांमध्ये कोरोना विषाणूचे स्टेन खोलवर आढळले. मायक्रोस्कोपद्वारे पाहिल्यावर कोरोना ते विषाणू असल्याची पुष्टी झाली. संशोधकांचे म्हणणे आहे की, शरीरात कोरोना असल्याची लक्षणे दिसत नाहीत, कारण शरीरात खोलवर कोरोनाचे सॅम्पल घेत नाहीत, हा विषाणू फुफ्फुसांमध्ये खोलवर राहू शकतो. त्यामुळे अनेकांचे अहवाल निगेटिव्ह येतात. 

त्यामुळे आरोग्य तज्ञांच्या मते, कोरोना विषाणूच्या संसर्गाचे, त्याच्या बदलत्या लक्षणांबद्दल अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी सतत संशोधन करणे आवश्यक आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News