कोरोनामुळे 'ही' स्पर्धा दोन वर्ष स्थगीत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 7 June 2020

तिरंदाजीच्या सर्वोत्तम तसेच सर्वंकष सुविधा असलेले हे जगातील सर्वाधिक मोठे केंद्र आहे. या ठिकाणी यापूर्वी जागतिक युवा तसेच जागतिक कुमार स्पर्धा झाली होती. 

मुंबई : जागतिक तिरंदाजी स्पर्धा अपेक्षेनुसार लांबणीवर टाकण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये अमेरिकेत ठरलेली ही स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला आहे. अमेरिकेत होणारी ही स्पर्धा यांकतॉन तिरंदाजी केंद्रावर होणार होती. तिरंदाजीच्या सर्वोत्तम तसेच सर्वंकष सुविधा असलेले हे जगातील सर्वाधिक मोठे केंद्र आहे. या ठिकाणी यापूर्वी जागतिक युवा तसेच जागतिक कुमार स्पर्धा झाली होती. 

कोरोनाच्या आक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर मर्यादा आहेत; तसेच बहुतेक देशात स्पर्धा स्थगितच आहेत. त्यामुळे स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय कधी होणार, याचेच औत्सुक्‍य होते. ही स्पर्धा वर्ल्ड गेम्सची पात्रता स्पर्धा होती. ही 2021 ची स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर पडली आहे. त्यामुळे अमेरिकेतील जागतिक स्पर्धेऐवजी स्वतंत्र पात्रता स्पर्धा घेण्याचे जागतिक तिरंदाजी संघटनेने ठरवले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News