कोरोनामुळे या व्यक्तींना धोका; संशोधनातून उघड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 15 June 2020
  • लंडनमधील किंग्स कॉलेजचे प्राध्यापक फ्रान्सस्को रुबिनो यांचे मत

मुंबई : कोरोना विषाणूंबाबत नवनवे खुलासे समोर येत आहेत. यापूर्वी केलेल्या संशोधनात कोरोना विषाणूंमुळे डायबिटीस रुग्णाच्या आरोग्यास धोका निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले होते. नवीन संशोधनात मात्र कोरोना विषाणूंमुळे निरोगी व्यक्तीमधील डायबिटीसचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे.

इंग्लंडमधील किंग्स कॉलेज लंडनमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. येथील संशोधकांच्या अभ्यासानुसार नवीन कोरोना विषाणूंचा एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात येण्याचा कालावधी हा अत्यंत कमी असल्याकारणाने हा विषाणू रक्तातील ग्लुकोज मेटाबोलिज्म वर कशाप्रकारे परिमाण करतो, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

लंडनमधील किंग्स कॉलेजचे प्राध्यापक फ्रान्सस्को रुबिनो यांनी दिलेल्या माहितीनुसार, डायबिटीस हा जुन्या आजारांपैकी एक आजार आहे. डायबिटीस आणि कोरोना विषाणू या दोन मोठ्या आजारांतील संघर्षाचा परिणाम आपल्याला जाणवू लागला आहे. अशा रुग्णांमधील वाढता डायबिटीस हा क्‍लासिक टाइप 1, टाइप 2 चा प्रकार आहे की, हा नवीन डायबिटीस आजार आहे हे अद्याप समजू शकलेले नाही, असे देखील ते पुढे म्हणाले.

या रुग्णांमध्ये नव्याने डायबिटीसची समस्या उद्भवली आहे या संशोधनात अशा रुग्णांवर लक्ष देण्यात येत आहे. आतापर्यंतच्या संशोधनात कोरोना विषाणू आणि डायबिटीस यांच्यामध्ये दुहेरी संबंध असल्याचे समोर आले आहे. पहिल्या संबंधात डायबिटीसमुळे कोरोना संक्रमणाची गंभीरता अधिक वाढते, तसेच रुग्णाला मृत्यूचा धोका असल्याचे दिसते. दुसरीकडे नवीन संशोधनानुसार कोरोना विषाणूमुळे ही डायबिटीसची समस्या उद्भवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नैराश्‍यासंबंधी अनेक आजार बळावण्याची शक्‍यता

कोरोनामुळे आतापर्यंत दगावलेल्या एकूण रुग्णांमधील 20 ते 30 टक्के रुग्ण हे डायबिटीसमुळे दगावले असल्याचे संशोधनात समोर आले आहे. मात्र कोरोना विषाणू या रुग्णांवर कशाप्रकारे परिणाम करतो हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. या महामारीमुळे नैराश्‍यासंबंधी अनेक आजार बळावण्याची शक्‍यता असल्याचे मात्र नवीन संशोधनात समोर आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News