आत्ता अभ्यासक्रमात कोरोनाचा पाठ; राज्य सरकार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 June 2020

'कोरोना पाठात कोणता कंटेन्ट असावा या विषयी अभ्यासक्रम समितीचे सदस्य आणि अभ्यासतज्ज्ञ यांच्यात चर्चा सुरु आहे, त्यानंतर संशोधक, डॉक्टर, विशेषतज्ज्ञ यांची मते मागवली जाणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना आखत आहे. जनजागृती करत आहे मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे कोविड-१९ विषयीची माहिती थेट अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. पश्चिम बंगाल सरकार शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाला कोरोनाचा पाठ समाविष्ठ करण्याच्या विचारात आहे.

'कोरोना पाठात कोणता कंटेन्ट असावा या विषयी अभ्यासक्रम समितीचे सदस्य आणि अभ्यासतज्ज्ञ यांच्यात चर्चा सुरु आहे, त्यानंतर संशोधक, डॉक्टर, विशेषतज्ज्ञ यांची मते मागवली जाणार आहेत आणि अभ्यासक्रमाचे स्वरुप ठरवले जाईल' अशी माहिती समितीचे अध्यक्ष अवीक मजूमदार यांनी सांगितली.

हा पाठ प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही वर्गांसाठी राहील. कोविड- १९ ची मूलभूत माहिती प्राथमिक वर्गांसाठी असणार आहे तर कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना केल्या पाहीजे या विषयी सविस्तर अभ्यास माध्यमिक वर्गांना असणार आहे, अशी अधिकाऱ्यांनी दिली.

'कोविड-१९ व्हायरसवर मात करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहीजे याविषयी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे' असे मत पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चॅटर्जी यांनी काही दिवसांपुर्वी व्यक्त केले होते. त्यात पार्श्वभुमीवर अभ्यासक्रम तयार केला जाणार असल्याची चर्चा आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News