या दोन खासदारांना कोरोनाची लागण ? घरात स्वत:ला केलं कैद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 9 March 2020

अमेरिकेतील दोन खासदार कोरोनाग्रस्त विषाणु असलेल्या लोकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ला घरात कैद करून घेतले आहे. त्यांची नावे टेड क्रुझ आणि पॉल गोसर अशी आहेत. 

जगभरात खळबळ माजलेल्या कोरोना आजाराला जनता प्रचंड घाबरलेली आहेत, मुळात अमेरिकेतही या आजाराने डोकेवर काढले असून त्याचा दणका आता चक्क खासदारांना बसला आहे. अमेरिकेत ४१४ लोकांना कोरोना झाला असून आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे घाबरलेल्या दोन खासदारांनी स्वत:ला घरात कैद करून घेतले आहे. 

अमेरिकेतील दोन खासदार कोरोनाग्रस्त विषाणु असलेल्या लोकांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनी स्वत:ला घरात कैद करून घेतले आहे. त्यांची नावे टेड क्रुझ आणि पॉल गोसर अशी आहेत. 

अमेरिकेत एका परिषदेला कोरोनाग्रस्त काही लोक हजर होते, त्यावेळी त्यांनी त्या दोन खासदारांची भेट घेतली. तसेच त्यांना त्यावेळी माहित नव्हते की, ते संक्रमित झालेले आहेत. सद्या त्यांच्यावर एका रूग्णालयात उपचार सुरू आहे. 

टेड क्रुझ म्हणतात की, "पीडित व्यक्तीला मी एका मिनिटासाठी भेटलो होतो. तसेच तो रूग्ण माझ्याशी हातमिळवत बोलला सुध्दा होता. मात्र, अजून तरी त्याच्यात तशी कोणती लक्षणे आढळून आलेली नाहीत." परंतु जाणीवपुर्वक स्वत:ला नजरकैद करून घेतले आहे, ज्यामुळे कुणालाही संसर्ग होऊ नये. 

त्याच पध्दतीने पॉल यांनी सुध्दा बराचवेळी त्यांच्याशी संवाद साधला असल्याचे म्हणटले आहे. अनेकवेळा त्यांच्याशी हास्तांदोलन सुध्दा केले आहे. भेटलेल्या लोकांमध्ये अजून तरी लक्षणे आढळून आलेली नाहीत. पण दोन्ही खासदार १४ दिवसतरी घराबाहेर पडणार नसल्याचे सांगितले जात आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News