नेमबाजी मार्गदर्शकांना कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • राजधानीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर भारतीय नेमबाजांचे 1 ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर अनिश्‍चित आहे.
  • त्याची अनिश्‍चितता रेंजवर मार्गदर्शन करीत असलेल्या मार्गदर्शकांना कोरोना झाल्यामुळे वाढली आहे.

नवी दिल्ली :- राजधानीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर भारतीय नेमबाजांचे 1 ऑगस्टपासून सुरू होणारे शिबिर अनिश्‍चित आहे. त्याची अनिश्‍चितता रेंजवर मार्गदर्शन करीत असलेल्या मार्गदर्शकांना कोरोना झाल्यामुळे वाढली आहे.

या रेंजवर मार्गदर्शन करीत असलेल्या महिला मार्गदर्शकास कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र त्या कोणाच्याही संपर्कात आलेल्या नाहीत, त्यामुळे रेंजवरील सराव सुरू राहणार असल्याचे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. रेंजची मालकी क्रीडा प्राधिकरणाकडे आहे. या रेंजवरील सराव 8 जुलैपासून सुरू झाला आहे.

नेमबाजी मार्गदर्शिका केवळ प्रशासकीय विभागात आल्या होत्या. त्या प्रत्यक्ष सराव होत असलेल्या ठिकाणी गेल्या नव्हत्या, तसेच कोणा नेमबाजांशी त्यांचा संपर्कही आला नव्हता. त्या मार्गदर्शकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर संपूर्ण रेंजचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News