विदेशी नागरिकांना झाला कोरोना; अफवा पसरविणाऱ्या तरुणावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 16 March 2020

सोशल मीडियावर काही उपद्रवी कोरोना विषयी अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी आफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन प्रशासनाने केले होते.

पुणे: देशभरात कोरोना व्हायसरने खुमाकुळ घातला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे काही पॉझीटीवर रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनग्रस्त रुग्णांची सख्या वाढतचं चाचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, जीम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच गर्दी टाळण्यासाठी जमाबंदीचा
आदेश लागू करण्यात आले आहे. मात्र, सोशल मीडियावर काही उपद्रवी कोरोना विषयी अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी आफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन प्रशासनाने केले होते. आफवा पसरवणाऱ्यावर कठोर कार्यवाही केली जाईल असेही सांगण्यात आले होते.

सोमवारी (ता.16) पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये काही विदेशी पर्यटक आले होते. त्यांना कोरोनाची लागन झाल्याची आफवा   वेटरने पसरवली होती. वेटर तरुणाने फोन करुन एका मदत केंद्राला ही माहिती दिली त्याच बरोबर सोशल मिडियावर ही आफवा पसरवली होती. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती पोलिसांना मिळताचं आफवा पसरवणाऱ्या तरुणावर कोरेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातला हा पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोना विषयी अनाधिकृत माहिती, चित्र, सोशल मीडियावर व्हायरल करु नयेत, असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवला जाईल असा आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी काही दिवासापुर्वी दिले होते. मात्र, काही लोकांनी हा आदेश झुंगावरुन आफवा पसरली होती, अशा आफवे खोरांवर कार्यवाही करण्यात आली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News