कोरोनाचा लढा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपेक्षाही मोठा: रवी शास्त्री

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 16 April 2020

विश्‍वकरंडक जिंकण्यासाठी आम्ही जसे सर्वस्व पणाला लावतो तसाच प्रतिकार करण्याची वेळ आली आहे

नवी दिल्ली ः कोरोनाविषाणू विरोधात सध्या सुरु असलेला हा लढा सर्व विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपेक्षाही मोठा आहे, असे मत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. खेळामध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी जसा लढा दिला जातो तसा लढा या कोरोनाविरुद्ध द्यायचा आहे, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.

सध्या कोरोनाने आपल्याला अशा स्थितीत आणले आहे की आपल्याला ही भींत तोडायचीच आहे. विश्‍वकरंडक जिंकण्यासाठी आम्ही जसे सर्वस्व पणाला लावतो तसाच प्रतिकार करण्याची वेळ आली आहे, असे सांगून शास्त्री म्हणतात, हा "वर्ल्डकप' आपल्याला जिंकायचाच आहे.

शास्त्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आणि आघाडीवर राहून ते लढत असल्याचे सांगितले. आपण ही लढाई जिंकू शकतो पण त्यासाठी मूलभूत गोष्टी आपल्याला करायला पाहिजे, पंतप्रधानांसारखे नेतृत्व या लढाईत आपल्याला मिळालेले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार तसेच या लढ्यात प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेल्या सुचना आपल्याला पाळायला हव्या. असे शास्त्री यांनी म्हटले आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या या विषाणूने सामान्य जिवनाबरोबर खेळाडूचे क्षेत्रही स्थब्ध केले आहे. कोणत्याही परिस्थितीत घरी रहा, सध्या बुलेटसारखी एकच गोष्ट मुक्त संचार करत आहे ती म्हणजे "कोरोना', असे शास्त्री यांनी आपल्या समालोचनातील खास शैलीत गेल्याच आठवड्यात मत व्यक्त केले होते.

विश्‍वकरंडक सारख्या स्पर्धेत 11 खेळाडू खेळतात येते आपण 1400 कोटी भारतीय लढत आहोत. "कम ऑन गाईस'...सर्वांनी एकत्र येऊया कोरोनाला हरवण्यासाठी 1400 कोटीं भारतीयांची तादक दाखवूया आणि मानवतेचा हा कप जिंकुया.
-रवी शास्त्री, टीम इंडियाचे प्रशिक्षक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News