शरीर संबंधावर कोरोनाचा परीणाम! बरे झालेल्या ८१ रुग्णांच्या वैद्यकीय तपासणीतून धक्कादायक माहिती उघड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 March 2020
कोरोना व्हायरस परीणाम थेट पुरुषांच्या हार्मोन्सवर होत आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये नपुसकता निर्माण होत आहे. अंडकोष निकामी होत आहेत, त्याचबरोबर सेक्स करण्याच उत्तेजन कमी होत चालल आहे अशी धकादायक माहिती चीन येथील वुहान विद्यापीठाने प्रसिद्ध केली.

कोरोना व्हायरसचा परीणाम फक्त वर्तमान पिढीवर होणार नाही तर भविष्यातील पिढीवर होणार आहे. कारण कोरोना व्हायरस परीणाम थेट पुरुषांच्या हार्मोन्सवर होत आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये नपुसकता निर्माण होत आहे. अंडकोष निकामी होत आहेत, त्याचबरोबर सेक्स करण्याच उत्तेजन कमी होत चालल आहे अशी धकादायक माहिती चीन येथील वुहान विद्यापीठाने प्रसिद्ध केली.

कोरोना व्हायरस पासून ठणठणीत बरे झालेल्या ८१ लोकांचे संशोधन वुहान विद्यापीठाने केले. संशोधनाचा आहवाल medrexiv.org या संकेत स्थाळावर प्रकाशिक करण्यात आला. ८१ रुग्णा हे २० ते ५४ वयाचे होते. संशोधन करताना झॉन्गनान रुग्णालयाची मदत घेण्यात आली. त्याच बरोबर हुबेई क्लीनिकल संशोधन सेंटर फॉर प्रीनेटर डायग्नोसिस एंड बर्थ हेल्थ संशोधकांची मदत घेण्यात आली.

संशोधन केलेल्या रुग्णांना जानेवारीमध्ये भरती करण्यात आले होते. त्यांची तब्बेत ठिक होत असताना हार्मोन्सची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रुग्ण ठणठणीत बरा झाल्यानंतर पुन्हा तपासणी करण्यात आली. कोरोनामुळे पुरुषांमधीन टेस्टोस्टेरॉन और ल्यूटीनाइसिंग हार्मोन खरात होत चालले आहेत. त्यांना T/LH नावाने ओळखले जाते. T/LH खराब झाल्यामुळे अंडकोशात शुक्राणू तयार होत नाहीत. तसेच विर्यही कमी होते आणि माणसात नपुरसकता निर्माण होते.

ज्या रुग्णाची तपासणी करण्यात आली त्याच्या शरीरात T/LH ते प्रमाण अत्याल्प ०. ७४ होते. ही खुप चिंताजनक बाब आहे. त्यामुळे भविष्याती पिढी खराब होणार आहे. टेस्टोस्टेरॉन हा घटक पुरुषांमध्ये अंडकोष, हाडांची ताठरता आणि बळ निर्माण करण्यासाठी मदत करते तर ल्यूटीनाइसिंग हा घटक स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असतो. तो शरीर संबंध ठेवण्यासाठी उतेज्जीत करतो. कोरोना व्हायरसमुळे शरीर संबंध ठेवण्याची उत्तेजन क्षणता कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्याती पिढीवर विपरीत परीणाम होणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News