कोरोना इफेक्ट: 10 वी,12 वी अभ्यासक्रमात कपात?; एक सारखा आशय कमी होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 June 2020

अभ्यासक्रमात एक समान आशय असलेला भाग रद्द करावा असा प्रस्ताव शिक्षण तज्ज्ञांनी सरकार समोर मांडला आहे. त्याप्रमाणे सरकार नवीन शैक्षणिक संत्राचा 2020-21 अभ्यासक्रम तयार करणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारणे देशात लोकडाऊन सुरु केले. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सु्ट्टी देण्यात आली. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय उशीरा सुरु होतील. शिक्षणाचा कालावधी कमी होईल. कमी कालावधीत शिक्षणकांना संपुर्ण अभ्यासक्रम शिकवणे शक्य होणार नाही, त्यामुळे दहावी आणि बारावी वर्गाचा अभ्यासक्रम कमी करण्याचा  विचार केंद्र सरकाराचा आहे. अभ्यासक्रमात एक समान आशय असलेला भाग रद्द करावा असा प्रस्ताव शिक्षण तज्ज्ञांनी सरकार समोर मांडला आहे. त्याप्रमाणे सरकार नवीन शैक्षणिक संत्राचा 2020-21 अभ्यासक्रम तयार करणार आहे.

लॉकडाऊन काळात सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केला. मात्र बहुसंख्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट सेवा नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणात सहभाग घेता आला नाही. यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा विचार केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाने केला. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCRT) व केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड यांना जून महिन्यात दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्याच्या सुचना केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिल्या. त्याच बरोबर अभ्यासक्रम कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकासान होऊ नये आणि त्याचा परीणाम विद्यार्थ्यांच्या निकालावर होऊ नये याचा विचार शिक्षण तज्ज्ञानी करावा असे पोखरियाल यांनी सांगीतले.

एकसमान पाठ कमी होणार

दहावी आणि बारावी अभ्यासक्रमात एकसमान असणारे पाठ कमी होणार आहोत. उदा. 10 वी विज्ञान विषयाला अॅसिड आणि साल्ट पाठात धातूसंबंधीत माहिती दिली आहे आणि धातू- अधातू पाठात धातू विषयी माहिती सांगितली आहे. असा एक समान आशय रद्द केला जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News