कोरोना इफेक्ट : वृद्ध जोडप्याने आयसीयूमध्ये एकमेकांचा हात धरला आणि...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 April 2020
  • प्रेमाचे उदाहरण…

जगभरात कोरोना विषाणूची 9 लाखाहून अधिक प्रकरणे झाली आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना या विषाणूचा पराभव करून सामान्य जीवन जगायचे आहे. इटलीमधील एक वयस्क जोडपे आहे, त्यांनी जगाला सांगितले की, या कठीण काळातही त्यांना आनंद कसा मिळतो. वास्तविक, 71 वर्षीय सैंड्रा आणि तिचे 73 वर्षीय पती जियानकार्लो मार्केच्या पूर्वेकडील भागात रुग्णालयात दाखल आहेत. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघांनीही त्यांच्या लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा केला. तो वाढदिवस देखील त्यांनी आयसीयूच्या वॉर्डामध्ये साजरा केला.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पार्टी केली आयोजित

जेव्हा नर्स रॉबर्टा फेरेट्टी यांना हे कळले की, हे जोडपे त्यांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहेत तेव्हा ते इतर वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या मदत घेतात आणि मेजवानी आयोजित करतात. रॉबर्टाने स्थानिक माध्यमांना सांगितले, ‘सैंड्रा खूप रडली, तिच्यासाठी नाहीतर तर तिला तिच्या पतीबद्दल फार काळजी आहे. इतक्या वर्षांनंतरही तो तिच्यावर किती प्रेम करतो हे त्याने तिला सांगितले.’

संपूर्ण सुरक्षिततेसह लग्नाचा वाढदिवस केला साजरा

त्यांच्या लग्नाचा वाढदिवस हा १० मिनिटे साजरा केला. छायाचित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की, वैद्यकीय कर्मचार्‍यांनी स्वत: चे रक्षण कसे केले आणि या जोडप्याचा लग्नाचा ५० वा वाढदिवस देखील अविस्मरणीय बनविली.  नर्स रॉबर्टा म्हणाली, ‘आम्ही छोट्या केक कपमध्ये 5-0 मेणबत्ती लावली. कारण ऑक्सिजनच्या जवळ आम्ही आग लावू शकलो नाही. आम्ही वेडिंग मार्च गाणे वाजवले आणि त्यांचे बेड जवळ आणले, त्यानंतर त्यांनी एकमेकांचा हात धरला.’

लवकरच रूग्णालयातून सोडण्यात येईल

आयसीयूची प्रमुख लुझिस्ना कोला म्हणाली, 'मी नेहमीच माझ्या सहकाऱ्यांना रुग्णाची ओळख आणि त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांबद्दल सांगतो आणि त्यांना बरे करण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी चमत्कार घडतात, जसे या प्रकरणात घडला आहे. ज्येष्ठ जोडप्याच्या मुलांना या वाढदिवसाचे छायाचित्र मिळाल्यावर त्यांनी रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे आभार मानले. स्थानिक माध्यमांच्या म्हणण्यानुसार, या जोडप्याला रिनिमेशनमधून सोडण्यात आले आहे आणि लवकरच दोघांना रूग्णालयामधून सोडण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News