कोरोना इफेक्ट: जगाने स्वीकारली भारताची 'ही' संस्कृती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 27 March 2020
प्रथम भेटल्यानंतर नमस्कार करुन पाहून्यांचे स्वागत करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आहे, मात्र पाश्चिमात्य देशामध्ये एकमेकांना भेटल्यानंतर अलिंगण घेऊन किंवा किस्स करुन स्वागत करण्याची प्रथा आहे.

कोरोना विषाणूचा प्रागुर्भाव टाळण्यासाठी जगभराती नागरिक भारतीय संस्कृतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे भारतीय संस्कृतीची चर्चा जगभरात केली जात आहे. कोरोना व्हायसर संसर्ग जन्य आजार असल्यामुळे अतिषय वेगाने पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विदेशीतील नागरिका एकमेकांना नमस्कार करुन स्वागत करतांना दिसत आहेत. नमस्कार करण्याची भारतीय प्रथा विदेशात रुढ झाली आहे.

प्रथम भेटल्यानंतर नमस्कार करुन पाहून्यांचे स्वागत करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीमध्ये आहे, मात्र पाश्चिमात्य देशामध्ये एकमेकांना भेटल्यानंतर अलिंगण घेऊन किंवा किस्स करुन स्वागत करण्याची प्रथा आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस हा संसर्ग होण्याची भिती विदेशी नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. म्हणून लांबूनच नमस्कार करण्याची प्रथा विदेशामध्ये सुरु झाली.

अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प असो की, इंग्लडच्या राज घराण्यातील प्रिन्स चार्ल्स यांना भेटण्यासाठी आलेल्या हुण्यांना अलिंगण देण्याऐवजी नमस्कार करुन स्वागत करत आहेत. ही भारतीय संस्कृतीसाठी अभिमानाची बाब ठरत आहेत. नमस्कार केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News