कोरोना इफेक्ट: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा लंडन दौरा रद्द

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 17 March 2020

अयोध्येवरून परतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सपत्नीक तीन दिवसांसाठी खालापुरातील भिलवले फार्म हाऊसवर होते.

मुंबई: कोरोनाच्या धास्तीमुळे विमानाने परदेश प्रवासाचे बेत आखणाऱ्या अनेकांना आपले दौरे रद्द करावे लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील लंडन दौरा रद्द केला आहे. त्याऐवजी त्यांनी खालापूर येथील भिलवले फार्म हाऊसवर जाण्यास पसंती दिली आहे. भिलवले येथील फार्म हाऊसमुळे खालापूर आणि ठाकरे कुटुंबाचे नाते अधिक घट्ट आहे.

मोठी बातमी: उठा, सज्ज व्हा! प्रतिबंधात्मक उपाय करून कोरोनाला पराभूत करा!

बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई यांचा भिलवले फार्म हाऊसवर अनेकदा मुक्काम असायचा. अयोध्येवरून परतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील सपत्नीक तीन दिवसांसाठी खालापुरातील भिलवले फार्म हाऊसवर होते. त्यानंतर आदित्य यांनीदेखील भिलवले येथे विश्रांतीसाठी पसंती दिली आहे.

मोठी बातमी: सामान्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी; महाविकास आघाडीचा निर्णय 

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News