कोरोनामुळे सेट परीक्षा लांबणीवर; 'या' महिन्यात परीक्षाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020

गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी नोंदणी केली. तरी देखील कोरोनामुळे अनेक विद्यार्थी सेट परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहीले,

मुंबई : अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्टोबर महिन्यात तर नवीन अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर महिन्यात सुरु होणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) लांबणीवर टाकण्यात आली. डिसेंबर महिन्यात सेट परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु आहे. त्यासाठी सावित्रिबाई फुले विद्यापीठाने हालचाल सुरु केली. विद्यापीठाने 28 जून 2020 रोजी सेट परीक्षा आयोजित केली होती मात्र, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सेट परीक्षा स्थगीत करण्यात आली. त्यानंतर अद्यापही परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शन तत्वानुसार सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाची परीक्षा आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यापीठे अंतिम वर्षाची परीक्षा सप्टेंबरमध्ये आयोजिक करणार आहेत. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी 1 नोव्हेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे आदेश विद्यापीठांना दिले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्या महाविद्यालये सुरु होतील. ऑक्टोबर- नोव्होबर दोन महिन्यात युपीएससी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे सेट परीक्षा घेण्यासाठी डिसेंबर महिना उपलब्ध होणार आहे. डिसेंबर महिन्यात सेट परीक्षा होण्याची अधिक शक्यता अधिक आहे. 

महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सावित्रिबाई फुले विद्यापीठ सेट परीक्षेचे आयोजन करते. सहाय्याक प्राध्यापक होण्यासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेसाठी नोंदणी केली. तरी देखील कोरोनामुळे अनेक विद्यार्थी सेट परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहीले, त्यामुळे विद्यार्थ्यांना सेटचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News