कोरोना आजार की बाजार?

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Tuesday, 18 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत, तरी देखील लाखो रुग्ण दररोज मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले. नक्की कोरोनामुळे रुग्णांचा जीव जात आहे की, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मुत्यू होत आहे?

मुंबई : जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला, सरकार, सामाजिक सामाजिक संस्था, संशोधक, उद्योगक कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत, तरी देखील लाखो रुग्ण दररोज मृत्यूमुखी पडत आहे. त्यामुळे जनतेत भितीचे वातावरण निर्माण झाले. नक्की कोरोनामुळे रुग्णांचा जीव जात आहे की, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मुत्यू होत आहे? अशा विविध शंका जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. साधा सर्दी, ताप, खोकला झाला तरी रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे खोटी माहिती सांगून रुग्णांचे अवयव काढून घटना घडत आहे, आणि अवयवाची खुल्या बाजारात विक्री केली जात आहे, आशा घडामोडींमुळे 'कोरोना आजार की बाजार?' या विषयावर यिनबझच्या विविध व्हॅट्सअॅप ग्रुपवर चर्चा करण्यात आली. त्यातील विद्यार्थी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आम्ही देत आहोत.

कोरोनाशी आज संपूर्ण देश लढतोय, तरीही कोरोनाचे हजारो पेशंट रोज सापडत आहेत आणि काही दिवसात लाखोपर्यंत ही जाऊ शकतात. हा व्हायरस नवीन असल्यामुळे बरचं संशोधन होणं बाकी आहे. अशात नागरिकांना योग्य ती माहिती मिळने गरजेचं आहे. N95 मास्कचं भरमसाठ उत्पादन आणि विक्री केल्यावर अस कळत की, तो कोरोना थांबवू शकत नाही आणि सरकार त्याला बॅन करत. पतंजलीद्वारे कोरोनाच आयुर्वेदिक औषधी बनविल्याच सांगन्यात आलं. नंतर आयुष मंत्रालयाने दखल घेतली. कित्येक देशात कोरोनाने थैमान घातले. Vaccine तयार करणाऱ्या कंपन्यानी त्याकडे बाजारपेठ म्हणून बघू नये.
- प्रतिक भालेराव

आज संपूर्ण जग कोरोना महाभयंकर आजारापासून त्रस्त आहे. अद्यापही या रोगाची लस संपूर्णपणे विकसित झाली नाही. अमेरिकेत तर मृत्यूचा आकडा हा सर्वात जास्त आहे. जवळ जवळ सगळ्या जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भारतातही कोरोनाचा आकडा हा दिवसागणिक वाढत चालला आहे. या महामारीमुळे कित्येकांना आपला व्यवसाय गमवावा लागला. सामान्य माणसाला एका वेळेस पोटभर अन्न मिळणे पण कठीण झाले. या कोरोनाच्या नावाखाली डॉक्टरांनी व्यवसाय चालू केला. साधा ताप, खोकला जरी आला तर त्या व्यक्तीला कोरोना झाला असं सांगून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येते. शासनाकडून रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध असताना सुद्धा रुग्णाकडून भरमसाठ पैसे उकलण्यात येत आहे. कोरोना हा डॉक्टरांसाठी पैसा कमावण्याचे साधन झाले आहे. मला वाटते कोरोना बघावं तेवढा भयंकर आजार नाही. योग्य आहार, व्यायाम, ईत्यादी नियम पाळले तर आपण कोरोनापासून बचाव करू शकतो. शासनाकडून जनतेला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळायला हवं. आणि जनता ही नियमाचं योग्य पालन करताना दिसून येत नाही. जसकाही कोरोना संपला असं समजून लोक तोंडाला मास्क न  बांधता फिरताना दिसून येते.
- कृष्णा गाडेकर

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News