कोरोनामुळे क्रिकेट सराव शिबिराच्या ठिकाणात बदल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

कर्नाटकमधील कोरोनाची साथ अद्याप आटोक्‍यात आलेली नाही. त्याचबरोबर बंगळूर अद्यापही रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीऐवजी जास्त सुरक्षित ठिकाणाचा विचार भारतीय मंडळ करीत आहे.

नवी दिल्ली: देशांतर्गत विमान सेवा सुरू होणार असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या शिबिराबाबत मंडळाने विचार सुरू केला आहे. हे शिबिर कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण असलेल्या बंगळूरऐवजी जास्त सुरक्षित असलेल्या धरमशाला येथे घेण्याचा विचार होत आहे.

कर्नाटकमधील कोरोनाची साथ अद्याप आटोक्‍यात आलेली नाही. त्याचबरोबर बंगळूर अद्यापही रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे बंगळूरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीऐवजी जास्त सुरक्षित ठिकाणाचा विचार भारतीय मंडळ करीत आहे. हिमाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तसेच धरमशालाचे स्टेडियमही सुरक्षित आहे, त्यामुळे त्या ठिकाणी शिबिर होऊ शकेल, असा विचार होत आहे.

मी हिमाचल प्रदेश संघटनेचा प्रतिनिधी आहे. त्यामुळे शिबिरासाठी मी आग्रह धरणार नाही. मात्र भारतीय मंडळाने याबाबत निर्णय घेतल्यास त्याचे स्वागतच होईल. भारतीय संघाचा नियमितपणे मुक्काम असलेल्या पॅव्हेलियन हॉटेलची मालकीही हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेकडे आहे, असे भारतीय मंडळाचे खजिनदार अरुण धुमळ यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातील परिस्थिती नियंत्रणाखाली असेल. हा भाग सुरक्षित मानला जात असेल, तर हिमाचल प्रदेश शिबिर पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी सर्व ते उपाय करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. हिमाचल प्रदेशात कोरोनाचे दीडशेच रुग्ण आढळले आहेत आणि त्यातील चौघांचे निधन झाले आहे. सध्या राज्यातील एकही जिल्हा रेड झोनमध्ये नसल्याचे सांगितले जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News