कोरोना आयुर्वेद प्रतिबंध

डॉ. शिवरत्न शेटे
Thursday, 16 April 2020
  • शत्रू कितीही बलाढ्य असला तरी किल्ल्याची तटबंदी मजबूत असल्यास शत्रू हरणार 

घाबरू नका! फक्त काळजी घ्या, मृत्यूदर100 पैकी फक्त 4 टक्के आहे. (रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे, वृद्ध, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, किडनी आजार अशा व्यक्तींना झाल्यास त्याना जास्त धोका असतो म्हणून त्यांनी विशेष काळजी घ्यावी) मास्क 4 पदरी स्वच्छ रुमाल नाका कडील बाजूस पेनाने खूण करा. (म्हणजे आतील आणि बाहेरील बाजू लक्षात येईल, जेणेकरून सकाळपासून बांधलेला रुमाल दुपारी जेवणाच्या निमित्ताने काढल्यास, आणि पुन्हा बांधताना, सकाळपासून बाहेर असलेली बाजू, चुकून पुन्हा आतील बाजूस बांधल्यास सर्व जंतू पुन्हा नाकात जातील)

प्रतिबंधात्मक सूचना

किल्ल्याची (शरीराची) तटबंदी (फुप्फुसे) मजबूत ठेवण्यासाठी करावयाचे श्वसन व्यायाम प्रकार

प्राणायाम Link_vdo बघा Watch_Share_VDO https://youtu.be/l_gJ50FtGdE

सकाळी ब्रश झाल्याबरोबर च्यवनप्राशचे 2 चमचे, त्यात आवळा~ highest Vit. (C आजही allopathy डॉक्टर साधी सर्दी किंवा respiratory infection मध्ये  immunity booster म्हणून  vit, Cच्या  tablets देतात) शिवाय चवनप्राशमध्ये इतरही 36 वनस्पती रोगप्रतिकार शक्ती  वाढविणाऱ्या असतात.

कलॉंजी बीज (काळ्या रंगाच्या कांद्याच्या बियाप्रमाणे असतात)

(Nigella_Sativa याचं लॅटिन नाव, विशेष म्हणजे कोरोनावर सद्य: स्थितीत प्रभावी ठरलेले HydroxyQuino (HCQ) जे औषध आपण अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्पच्या विनंतीने? निर्यात केले, त्यातील जे chemical आहे , तेच  कलोंजी बियात सापडते ThymoQuinone_Thymo_HydroQuinone आणि असे खूप सारे महत्त्वाचे chemical यात आढळतात म्हणून 1 चमचा बिया, पाण्यात भिजवून आपण खाऊ शकता  याचे किमान 10 फायदे आहेत.

काढा black_Tea प्रमाणे

साधारणत: मूठभर तुळशीचे पाने+प्रत्येकी 1gm अंदाजे सुंठ मीरे दालचिनी हळद सर्व घटक खलबत्त्यात Crush करून, एक व्यक्तिकरिता प्रमाण... 3 कप पाण्यात घटकद्रव्ये दिडकप होईपर्यंत उकळून गाळून गुळटाकून गरम चहाप्रमाणे प्या (हा काढा 24 तासात 3वेळा घेऊ शकता, यात कोणाला चहाची पत्ती टाकायची असल्यास हरकत नाही,

तुळशीत Oscimum Sanctum Orientin Apigenin Viceninare असे अनेक chemicals Antiviral H9N2 मध्ये सिद्ध झाले आहेत.

काळीमिरी Piper Nigrum मध्ये Piperine सारखे अनेक chemicals आहेत , ज्याचे  Anti Inflammatory action सिद्ध झालीय.

हळद Curcuma Longa त्यातील Curcumine चा, Anti-inflammatory effect Hay Fever(Running Nose, Sneezing etc नाक गळणे,  शिंका, घसा दुखणे) सारख्या आजारात सिद्ध झालाय. 【आयुर्वेदात हळद ही रसायन म्हणजे प्रतिकारशक्ती वाढविणारे,
रक्तप्रसादक, विषघ्न Anti-Toxic, कफघ्न म्हणजे कफ कमी करणारे】

दालचिनी Cinnamomum Zeylanicum याचा उपयोग  कफघ्न, वृष्य, AntiFungal, AntiHelmintic कृमीघ्न.

सुंठ Dry Ginger

कफघ्न, विषनाशक Toxin Neutraliser मधुमेह असणाऱ्यानी गुळ टाकू नये पित्त प्रकृतीने, उष्णतेचे त्रास असणाऱ्याने, सुंठ मीरे टाळावेत TCM Traditional Chinese Medicine (ex Agastache Rogusa इत्यादी) आज कोरोनावर संशोधन आधारित ठोस उपचार नसल्याने Allopathyच्या WHO निर्देशित औषधांसमवेत त्यांच्या पारंपरिक औषधांचा वापर चीनने केल्याने तिथे मृत्यूदर नियंत्रित राहिला.

TCM प्रमाणेच भारतातील आयुर्वेद आहे ज्याचा वापर केरळ राज्याने केल्याने तिथेही Death Rate Controlled आहे. स्वाईन Flu सुद्धा असाच धुमाकूळ घालीत असतांना केरळात तुळशीचे AntiViral effect सिद्ध झाले होते हे विसरून चालणार नाही (अमेरिका/ लंडन वरून आपल्या आयुर्वेदातील औषधांचा कोरोना नियंत्रणासाठी उपयोग सिद्ध झाला असा खलिता शिक्कामोर्तब करून आला की आम्हाला आमचे महत्त्व पटते.. काय करणार आम्हा भारतीयांची मानसिकता..

हळद वकडुलिंब पेटंट अमेरिकेने पळविल्यावर आमचे CSIR जागे झाले होते हे इतिहासआहे दररोज रात्री साबणाने मास्कचा रुमाल धुवून, डेटॉलच्या पाण्यात भिजवून रात्रभर वाळवून, दुसऱ्या दिवशी पुन्हा वापरा!

भाजी खरेदी केल्यावर Mediclor (हायपोक्लोराईड असल्याने) सारख्या द्रावणाचे थेंब पाण्यात टाकून, भाजी बुडवून, स्वच्छ धुवून मगच वापरा नोटा व कागदावरून सुद्धा कोरोना प्रसारित होऊ शकत असल्याने नोटा स्वीकारल्यावर सुद्धा हात  सॅनिटायझर किंवा साबणाने धुवा. कोरोनाच्या निमित्ताने लागलेल्या  सर्व चांगल्या सवयी किमान 5 फुटाच्या social distancingसहित ...

आयुष्यभर रुजवा (कोरोना effectसंपुष्टात येण्यासाठी अनेक वर्षे लागतील, शिवाय त्यानंतरही अजून नवीन विषाणू येईल, तेंव्हा याच सवयी आयुष्यभर कामाला येतील) घरातच बसा, अत्यावश्यक कार्यासाठी बाहेर पडल्यास, घरी परतल्यावर  केसांना (केसांमध्ये microbes/विषाणू जास्त अडकतात) शांपू लावून, साबणाने अंघोळ करा, बाहेरून जाऊन आल्यानंतर कपडे घरात घेऊन न जाता,अंत्यसंस्काराच्या सिद्धांताप्रमाणे... साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत)
 वरील प्रतिबंधात्मक उपाय केल्यानंतरही चुकूनही कोरोनाचे लक्षण दिसल्याबरोबर शासन निर्देशित हॉस्पिटलमध्ये तातडीने जावे.

(लेखक MD (ayurved), CCY (kaivalyaDham) तथा शिवव्याख्याते आहेत. संपर्क- 9272710020)
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News