कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १०१ वर; २४ रुग्ण ठणठणीत बरे

यिनबझ टीम
Tuesday, 24 March 2020
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१० वर पोहचला आहे, मात्र आनंदाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्त २४ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे.

मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १०१० वर पोहचला आहे, मात्र आनंदाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्त २४ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहे. मुंबईत कोरोनाबाधिताचा सोमवारी तिसरा बळी गेला आहे. मूळचा फिलिपिन्सचा असलेल्या नागरिकाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाल्याने आता देशातील मृतांचा आकडा आता १० वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही ६८ वर्षीय फिलिपिन्सची नागरिक असल्याचे समजते आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केल्याचे समोर आले आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला. ही व्यक्ती एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपिन्सहून १० जणांच्या गटासह मुंबईत आली होती. ते सर्वात अगोदर मुंबईत आले. त्यानंतर ते नवी मुंबईत गेले आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून दिल्लीला गेले. विशेष म्हणजे त्यानंतर ते दिल्लीतून पुन्हा मुंबईत आले आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेले.

तिथे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना वाशी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना उपचारासाठी थेट कस्तुरबा रुग्णालयात हलवले. कस्तुरबा रुग्णालयात तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर या गटातील इतरांनाही कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले, त्यातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News