कोरोना तिसऱ्या टप्प्यात? प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून 'या' सुचना  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 23 March 2020

खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, जीम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच गर्दी टाळण्यासाठी जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आला. कोरोना 3 तिसऱ्या टप्प्यात पोहचण्याती शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून काही सूचना देण्यात येणार आहेत. 

मुंबई: देशभरात कोरोना व्हायसरने खुमाकुळ घातला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे काही पॉझीटीवर रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनग्रस्त रुग्णांची सख्या वाढतचं चाचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा, महाविद्यालय, जीम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तसेच गर्दी टाळण्यासाठी जमाबंदीचा आदेश लागू करण्यात आला. कोरोना 3 तिसऱ्या टप्प्यात पोहचण्याती शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडून काही सूचना देण्यात येणार आहेत. 

काही सूचना: 

 •  दुधाच्या पिशव्या आधी बाहेरून धुउन घ्या, दूध काढून घ्या आणि आपले हात परत साबणाने धुआ.
 •  वृत्तपत्रे बंद करा. नाहीच जमले तर एका ट्रे मध्ये चोविस तास हात न लावता ठेवा. दुसऱ्या दिवशी वाचा.
 • पोस्टाने येणारी पत्रे, कुरिअर वगैरे साठी पण वर दिल्याप्रमाणेच करा.
 •  जमत असेल तर कामवाली, जेवण करणारी यांना 'भरपगारी' सुट्टी देऊन टाका.
 • सुट्टी नाही देऊ शकत तर त्यांना घरी आल्यावर प्रथम साबणाने हात पाय धुवायला सांगा.
 • पुढील पंधरा वीस दिवसांसाठी फक्त गरज लागेल एवढे सामान (धान्य, कडधान्य, भाजी, इतर सामान) भरून ठेवा. अगदीच गरज असेल तरच बाहेर जाऊन सामान आणा.
 • ज्यांना बाहेर जावे लागतंय त्यांनी गर्दीच्या वेळा टाळून बाहेर जाणे, ट्रेन बस ने प्रवास करणे.
 • ज्यांना सुट्टी घेणं शक्य आहे त्यांनी सुट्टी घेऊन टाकावी. गणपती, दसरा, में महिना वगैरे नंतर बघुया.
 • घरी बसलंय म्हणून बियर/ड्रिंक्स घेणे टाळा. शरीराची प्रतिकारशक्ती वाढणे गरजेचे आहे.
 • फळे भाजीपाला घरी आणल्यावर नीट धुउन घ्या, थोडावेळ बाहेर ठेवा, आपले हात पुन्हा धुआ आणि मगच वापरा/खा.
 • झोमॅटो, स्विग्गी अजिबात बंद करा.
 • पुन्हा सांगतोय, वेळोवेळी हात धुणे आणि सगळ्यांनाच सवय लावणे.
 • चेहऱ्यावर हात अजिबात न नेणे.
 • बाहेर जाऊन, प्रवास करून आलात तर कपडे वॉशिंग मशिनमध्ये टाका.
 • कपड्याना इस्त्री घरीच करा.
 • सिनियर सिटीझन, मुले यांना घरात आणि घरातच ठेवा. दरवाज्यावर उभे राहून शेजारयांशी गप्पा वगैरे प्रकार टाळा.
 • दरवाजाची बेल कोणी येऊन गेले कि पुसून घ्या. रिमोट कंट्रोल इत्यादी सॅनिटायझर ने कमीत कमी दिवसातून एकदा पुसून घ्या
 • स्वतःची काळजी घ्या बरोबर आजूबाजूच्यांची पण काळजी घ्या..

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News