अशा युजर्सना अद्दल घडवणार; ट्विटरने घेतला अनोखा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

जर यापुढे एखाद्या संस्था आणि पक्षांनी एकच ट्विट अनेक वेळा कॉपी पेस्ट करत असेल तर त्याचे ट्विट अपोआप हाईड होईल,

मुंबई : सोशल मीडियावर सर्वात प्रभावी माध्यम म्हणून ट्विटर कडे पाहिले जाते. ट्विटरची विश्वासाहर्ता आजही जनतेमध्ये कायम आहे. त्यामुळे ट्विटरने आपल्या युजर्सना चांगल्या सेवा देण्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येते. सध्या ट्विटरवर कॉपी- पेस्ट करणाऱ्यांची फोज निर्माण झाली आहे. अशा युजर्सला आळा घालण्यासाठी  ट्विटरने एक नवीन फिचर लॉन्च केले आहे. यापुढे कॉपी- पेस्ट करून ट्विट करणाऱ्या युजर्सचे ट्विट हाईड केले जाणार आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात एकसमान कन्टेन्ट फिरण्याची शक्यता कमी होणार आहे.

एखाद्या राजकीय व्यक्तीने किंवा संस्थेने केलेले ट्विट अनेक वेळा युजर्स कॉफी करून पुन्हा ट्विट करतात. त्यामुळे विशिष्ट विचारसरणीचा समुहा त्या ट्विटला पुन्हा पुन्हा कॉपी पेस्ट करुन फिरवत असतो. त्यामुळे सामाज द्वेश निर्माण होन्याची शक्यता असते. अशा कॉपी पेस्ट करणाऱ्या युजर्सचे ट्विट यापुढे हाईड केले जाईल असा इशारा ट्विटरने दिला. यापुढे युजर्सना एक खास पिक्चर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News