लहान मुलांचा लठ्ठपणा असा ठरू शकतो घातक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 24 September 2019

लठ्ठ असलेल्या टीनएज मुलांमध्ये हायपरटेंशन आणि उच्च रक्तदाब ही समस्या निर्माण होते.अतिरिक्त चरबीमुळे शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते.

लहान मुले देवाघरची फुले असे म्हंटले जाते. अशी हि लहान मुले  फार गुटगुटीत दिसतात. त्यामुळे मुलांचे कौतुक केले जाते. तसेच खाण्या पिण्याच्या बाबतीत त्यांच्या कडे हवे तसे योग्यवेळी लक्ष दिले जात नाही. अश्याने त्यांच्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष होते. लहान असल्याने मुलांचे वजन आणि त्यांच्या उंची नुसार  आदर्श वयापेक्षा २० टक्क्यांनी अधिक वजन असणे म्हणजे लठ्ठपणा! लठ्ठपणामुळे मुलांच्या शरीरातील त्वचेखाली अतिरिक्त चरबी साठत जाते. तुमच्या मुलाचा बीएमआय ३०च्या पुढे असेल, तर ही काळजीची बाब आहे.लहान मुलांच्या लठ्ठपणाला अनुवंशिकताही कारणीभूत आहे. आई-वडील लठ्ठ असतील, तर मुलाचीही वाढ त्याच अनुषंगाने होते. 

जंकफूड खाणे, मोबाइल, व्हिडिओ गेम यामुळे; तसेच कमीत कमी शारीरिक हालचाल यांमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत जातो.लठ्ठपणामुळे हातापायांच्या खालील भागात अति वजनाच्या दाबामुळे विकृती येण्याची शक्यता असते. सांध्यांवर येणाऱ्या वजनामुळे सांध्यांची झीज होऊन स्लीप डिस्क किंवा सांधे निखळण्याची समस्या निर्माण  होते. वजन प्रमाणाबाहेर वाढल्यास किंवा आरोग्यास धोका निर्माण होऊन शस्त्रक्रिया करणे भाग असते.अति वजनामुळे श्वसनक्रियेवर परिणाम झाल्याने मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते. यामुळे मुलांना लहान वयातच अस्थमा होऊ शकतो. लठ्ठ असलेल्या टीनएज मुलांमध्ये हायपरटेंशन आणि उच्च रक्तदाब ही समस्या निर्माण होते.अतिरिक्त चरबीमुळे शरीरातील ग्लुकोजच्या पातळीवर नियंत्रण ठेवणे अवघड जाते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी शरीराला पुरेशा इन्शुलिनची गरज भासते. या स्थितीत मुलांना लहान वयातच मोठ्यांना होणाऱ्या टाइप-२ या मधुमेहाची समस्या निर्माण होते.

हे सगळे आजार थांबवण्यासाठी पालकांनी वेळीच  मुलांच्या शाळेतील शारीरिक फिटनेस उपक्रमांमध्ये विशेष रस घ्यावा. तुमची मुले एकलकोंडी असतील व त्यांना इतर मुलांसोबत खेळण्यात रस नसेल, तर तुम्ही त्यांना वैयक्तिक खेळ किंवा उपक्रमांमध्ये गुंतवा. यामुळे ते स्वस्थ व निरोगी राहतीलमुलांच्या लठ्ठपणावर वेळीच नियंत्रण ठेवायचे असल्यास त्या मुलांकडून योग्य तो व्यायाम, योगासने, आणि इतर ऍक्टिव्हिटी करून घेणे योग्य ठरेल मैदानी खेळ, चपळता आणणाऱ्या गोष्टीं मध्ये मुलांना आवड निर्माण केली पाहिजे. हे केल्याने मुलांच्या लठ्ठपणावर नियंत्रण करता येते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News