विपरीत परिस्थितीत मात करुन त्याने मिळावले 97 टक्के

मुशिरखान कोटकर
Tuesday, 11 June 2019
  • घरची परिस्थिती जेमतेम किरकोळ केरोसीन विक्रेते असलेल्या वडिलांची आमदानी साधारण असताना विपरीत परिस्थिती.
  • येथील म्युनिसिपल श्री शिवाजी हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत यंदाही आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
  • जेमतेम परिस्थिती असूनही नेत्रदीपक यश प्राप्त केले, असल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

देऊळगाव: घरची परिस्थिती जेमतेम किरकोळ केरोसीन विक्रेते असलेल्या वडिलांची आमदानी साधारण असताना विपरीत परिस्थिती. त्यावर मात करीत जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य कायम ठेवून दहावीच्या शालान्त परीक्षेत 96.60 टक्के गुण प्राप्त करून येथील श्री शिवाजी हायस्कूल चा विद्यार्थी सुमीत कैलास बुजाडे याने नेत्रदीपक यश मिळवीत आई वडिलांचा
विश्वास सार्थ ठरविला आहे.

येथील म्युनिसिपल श्री शिवाजी हायस्कूलने दहावीच्या परीक्षेत यंदाही आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सर्वसामान्य घरातील विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या शाळेतील विद्यार्थी सुमीत कैलास बुजाडे याने 96.60 गुण प्राप्त केले आहे. तो शाळेतून पहिला ठरला असून विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण घेतले आहे. वडील कैलास बुजाडे किरकोळ केरोसीन विक्रेते असून यावरच ते आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवितात तर आई लताबाई घरीच मिरची दळून मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी हातभार लावतात. अशा जेमतेम परिस्थितीत सुमीत याने शिकवणी वर्ग न लावता शाळेतील शिक्षण व स्वतः अभ्यासातील सातत्य कायम ठेवून गुणवत्ता प्राप्त केली. 

पुढे डॉक्टर होण्याचे स्वप्न बघणार्‍या सुमितच्या दोन्ही बहिणी पूजा व दिव्या एमबीबीएस पदवी प्राप्त असून पूजा ही सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून दोन महिन्यापूर्वी रुजू झाली तर दिव्या जळगाव खानदेश येथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ला एमबीबीएस वर्षात शिक्षण घेत आहे. सुमीत याने जिद्द, चिकाटी आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर घरची जेमतेम परिस्थिती असूनही नेत्रदीपक यश प्राप्त केले, असल्याने त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शाळेचे प्राचार्य शेख अजीज, उपप्राचार्य संजय देशमुख, पर्यवेक्षक विजय आव्हाने, राजेश सपाटे, शिक्षक दिवाकर आढाव, दिवाशंकर वैद्य यांनी सुमितच्या घरी जाऊन त्याच्यासह आई-वडिलांचा सत्कार केला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News