विद्या विकास महाविद्यालयात संविधान दिन संपन्न

निखिल ठाकरे, हिंगणघाट
Monday, 2 December 2019

महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक समिती तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावरील उपस्थितानी संविधान संकल्पनेवर आपले मनोगत व्यक्त करताना स्वतंत्र, समता व बंधुता या तीन बाबींचा सहयोगी आपल्या संविधानात असून त्यामुळे देशातील प्रत्येक जाती, धर्म व पंथाचा व्यक्ती निर्भयपणे वावरत असल्याचे वक्तव्य केले.

समुद्रपूर - विद्या विकास महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिनाच्या कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश बोबाटे, प्रा. नयना शिरभाते, प्रा. महाकाळे, प्रा. रामटेके, प्रा. ईश्वर सोमनाथे, प्रा. नितीन अखूज, प्रा. मेघश्याम ढाकरे, प्रा. विलास बैलमारे, प्रा. किरण वैद्य, इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक समिती तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावरील उपस्थितानी संविधान संकल्पनेवर आपले मनोगत व्यक्त करताना स्वतंत्र, समता व बंधुता या तीन बाबींचा सहयोगी आपल्या संविधानात असून त्यामुळे देशातील प्रत्येक जाती, धर्म व पंथाचा व्यक्ती निर्भयपणे वावरत असल्याचे वक्तव्य केले.

अध्यक्षीय मनोगतात प्रा. डॉ. रमेश बोबाटे यांनी संविधानावर प्रकाश टाकत आपल्या देशातील सविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ सविधान असून यात इंग्लंड, अमेरिका, इत्यादी देशाच्या सविधानाच्या अभ्यास करून अतिशय कठोर परिश्रमाने सदर संविधानाची निर्मिती झाली असल्याचे "संविधान" हे प्रत्येक भारतीयांसाठी ग्रंथ असल्याचे प्रतिपादन केले.

सदर कार्यक्रमाच्या सुरवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रा. डॉ. राजकुमार रामटेके यांनी प्रास्ताविकेचे वाचन करून उपस्थित प्राध्यापक, वृद्ध शिक्षकेत्तर, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनाच्या स्वयंसेवकांनी सविधानाचे पालन करण्याचे शपथ घेतली. 

कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनाच्या जिल्हा समन्वयक प्रा. मेघश्याम ढाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. नितीन अखूज यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करिता प्रा. गजबीये, प्रा. मोहोड, प्रा. कारमोरे, प्रा. वालदे, प्रा. सातपुते, प्रा. कळसकर, प्रा. निखाडे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या डॉ. स्वाती रेवतकर व स्वयंसेवकांनी सहकार्य केले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News