'या' तारखेपासून दुबईत शिबिर घेण्याचा विचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या आयपीएलव्यतिरिक्त कसलाही विचार करण्यास तयार नाही

मुंबई:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सध्या आयपीएलव्यतिरिक्त कसलाही विचार करण्यास तयार नाही. या लीगसाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांचा बळी दिल्यानंतर आता राष्ट्रीय शिबिराचाही बळी देण्याबाबत विचार केला जात आहे.

भारतीय खेळाडू मार्चपासून मैदानावर उतरलेले नाहीत. आयपीएल संपल्यावर लगेचच ऑस्ट्रेलिया दौरा आहे. त्यापूर्वी संघाचे शिबिर घेण्यासाठी आग्रह केला जात होता आणि त्यानुसार मोटेरा येथे शिबिर घेण्याचीही तयारी केली जात होती; मात्र आता आयपीएल फ्रॅंचाईजना आपल्या खेळाडूंचे दोन आठवड्यांचे शिबिर घ्यायचे आहे. त्यामुळे राष्ट्रीय शिबिरासाठी आता वेळ नाही, असे कारण दिले जात आहे.

आयपीएलमधील काही फ्रॅंचाईजी दुबईत शिबिर घेण्याचा विचार करीत आहेत. खेळाडू दीर्घकाळ मैदानात उतरले नसल्याने हे शिबिर आवश्‍यक असल्याचे त्यांचे मत आहे आणि ते पटण्यासारखेही आहे, असे भारतीय मंडळाचे खजिनदार अरुण धुमल यांनी सांगितले. भारतीय संघाच्या शिबिराबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही; पण वेळ फार कमी आहे, याकडेही सर्वांनी लक्ष द्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

 फ्रॅंचाईजनी आम्ही 6 सप्टेंबरपासून दुबईत शिबिर घेण्याचा विचार करीत असल्याचे संकेत दिले आहेत. आता कोरोना महामारी असताना स्पर्धा तसेच शिबिर घेण्यासाठी असलेले नियम लक्षात घेतल्यास शिबिरातील खेळाडूंना ऑगस्टच्या अखेरीसच दुबईत दाखल व्हावे लागेल. या परिस्थितीत भारतीय संघाचे शिबिर कसे होणार,

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News