तरुण नेता हार्दिक पटेल अटकेत; 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

सकाळ (यिनबझ)
Sunday, 19 January 2020

2015 मध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला होता. सत्र न्यायालयातील देशद्रोहाच्या खटल्यात सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते.

अहमदाबाद:  काँग्रेसचा तरुण नेता हार्दिक पटेल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली विरगाममधील हासलपूर येथून अटक केली. कोर्टानं अटकेचे आदेश देताच पोलिसांनी काही तासांतच हार्दिक यांना बेड्या घातल्या. त्यांना 24 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.

2015 मध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवण्यात आला होता. सत्र न्यायालयातील देशद्रोहाच्या खटल्यात सुनावणीस गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले होते. या अटकेच्या वृत्ताला सायबर गुन्हे शाखेचे राजदीप सिंग यांनी दुजोरा दिला आहे. 

2015 साली हार्दिक पटेल पाटीदार समाजाच्या आरक्षण आंदोलन समितीचे नेतृत्व करत होते. 25 ऑगस्ट ला झालेल्या भव्य सभेनंतर गुजरातमध्ये ठीकठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती अगदी हिंसाचार पेटला होता. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News