पुणे विद्यापीठात शुल्कवाढीवरून गोंधळ, समितीची स्थापना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 December 2019

पुणे - विद्यापीठामार्फत चालविल्या जाणाऱ्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाची शुल्कवाढ करावी किंवा नाही यावरून अधिसभेत दोन गट पडल्याने सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. त्यावर दोन्ही बाजूंना शांत करत, शुल्क निश्‍चितीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सर्व घटकांचे ऐकून घेऊन, योग्य निर्णय घेतला जाईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी स्पष्ट केले. 

विद्यापीठाच्या अधिसभेत  व्यावसायिक अभ्यासक्रमाचे २० टक्के आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क ३० टक्के वाढवावे, असा ठराव प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांनी दिला होता. हा ठराव आल्यानंतर त्यास विद्यार्थी संघटना, प्राध्यापक यासह अनेकांनी विरोध केला होता. 

या ठरावावर अधिसभेत चर्चा करताना प्रकाश पाटील म्हणाले, ‘विद्यापीठाने २०१०-११ पासून कोणतीही शुल्कवाढ केलेली नाही. संस्था चालविताना मोठ्या प्रमाणात खर्च वाढलेला आहे. त्यामुळे हा प्रस्ताव ठेवला आहे.’’

राज्यातील दुष्काळी स्थिती, त्यात परत झालेला अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात विदारक स्थिती आहे. असे असताना शुल्कवाढ केल्यास, त्याचा उद्रेक होईल. त्यामुळे ही शुल्कवाढ करू नये, अशी भूमिका अनेक सदस्यांनी घेतली. 

या वेळी सभागृहात शुल्कवाढीचे समर्थक व विरोधकांनी आपापल्या भूमिका आक्रमकपणे मांडली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News