एक गोंधळलेला मतदार 

कवि महेश शेवाळकर
Friday, 20 September 2019

अचूक टायमिंग साधेल काय?
धनुष्याची दोरी तुटणार तर नाही ना?
रेल्वे इंजिन सुरूच नाही झालं तर?
भिंतीवर हाताचा पंजा आपटून

निष्टे ची विष्टा झाली 
लोकशाहीची चेष्टा झाली
तुमच्या माकडउड्या पाहून
इमानदारी उष्टी झाली

नवऱ्याने बायको बदलली
बायकोने नवरा बदलला
कोण कुणाची आई झाली
कोण कुणाचा बाप झाला

आजवर पाळलेला 
आता कुणासाठी तरी साप झाला
पण साला 
माझ्या डोक्याला लै ताप झाला

कमळाला पाकळ्या किती?
चिखलात रुतलेल्या देठाला
वजन सहन होईल काय?
भिंतीवरचे घड्याळ

अचूक टायमिंग साधेल काय?
धनुष्याची दोरी तुटणार तर नाही ना?
रेल्वे इंजिन सुरूच नाही झालं तर?
भिंतीवर हाताचा पंजा आपटून

हात गेला सुजून
आणि लोकशाहीला जाताना पाहिलं
डोळे पुसून पुसून
 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News