विरोधाभासातला पाऊस 

सरीता व्यवहारे, सातारा
Sunday, 4 August 2019

एकीकडे पाऊस पडतोय मुसळधार 
डोळ्यातील पाण्यालाही आली 
आनंदी किनार 
तर दुसरीकडे पाऊसाने माजवलाय हाहाकार ।।१।।

एकीकडे चहा आणि भज्यांची 
वेगळी तय्यारी 
तर दुसरीकडे 'रेस्क्यू ऑपरेशनची'
गडबड सारी ।।२।।

का करतोस रे असा रंगाचा बेरंग 
एकीकडे ओला दुष्काळ तर 
दुसरीकडे सुका दुष्काळ 
असा कसा रे तुझा 
अनोखा ढंग ।।३।।

एकीकडे नको असताना पडतोयस मुसळधार 
तर दुसरीकडे लोकांच्या 
डोळ्यातील पाण्यालाही येईना धार ।।४।।

एकीकडे पाऊस पडतोय मुसळधार 
डोळ्यातील पाण्यालाही आली 
आनंदी किनार 
तर दुसरीकडे पाऊसाने माजवलाय हाहाकार ।।१।।

एकीकडे चहा आणि भज्यांची 
वेगळी तय्यारी 
तर दुसरीकडे 'रेस्क्यू ऑपरेशनची'
गडबड सारी ।।२।।

का करतोस रे असा रंगाचा बेरंग 
एकीकडे ओला दुष्काळ तर 
दुसरीकडे सुका दुष्काळ 
असा कसा रे तुझा 
अनोखा ढंग ।।३।।

एकीकडे नको असताना पडतोयस मुसळधार 
तर दुसरीकडे लोकांच्या 
डोळ्यातील पाण्यालाही येईना धार ।।४।।

हरलो रे आम्ही पाहून तुझा हाहाकार 
मान्य आहे ,आम्हीच आहोत जबाबदार 
कधी होईल आम्हाला साक्षात्कार 
अन् सृष्टी होईल हिरवीगार 
तेव्हा कुठे आमच्या जगण्याला येईल बहार।। ५।।

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News