पाकिस्तानच्या 'या' हिंदू क्रिकेटरवर "इस्लाम कबूल कर लो!" चा पगडा...

यिनबझ टीम
Friday, 31 January 2020

पाकिस्तानचा माजी स्पिनर गोलंदाज दानिश कनेरिया (Danish Kaneria) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 39 वर्षीय कनेरिया हा तसा सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असतो, त्यामुळे एका महिलेने खास सोशल मिडीयावरच त्याला एक अपिल केली आहे. इस्लाम कबूल कर, इस्लामविना जीवनाला काहीच अर्थ नाही, असं मत एका #askdanish या सेशनमध्ये मांडलं होतं.

दानिश काहीदा आपल्या ट्विटरवर लाईव्ह आल्यानंतर #askdanish च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना त्यांच्या मनातले प्रश्न विचारण्याची संधी देत असतो, त्याच माध्यमातून एका महिलेने संबंधीत प्रश्न विचारला आहे. 

ट्विटरवर आमला गुल (Amna Gull) नावाच्या युजर्सने हा प्रश्न विचारला आहे. तुम्ही इस्लाम कबूल करा, इस्लाम म्हणजेच सगळं आहे. मला माहित आहे की इस्लामविना जीवन व्यर्थ आहे. इस्लाम नसताना आपले जीवन मृत्यूसारखेच आहे. तुम्ही कृपया इस्लाम कबूल करा, अशा शब्दात या युजर्सने दानिशला प्रश्न विचारला आहे.

यावर उत्तर देत कनेरियाही म्हणतो की आपल्यासारखेच अनेक लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे. परंतू ते सगळेच असफल राहिले आहेत. इतकच नाही, तर मी हिंदू असल्याचा मला गर्व असल्याचेदेखील त्याने ट्विटरवर एका युजरला उत्तर देताना म्हटलं आहे.

हे सगळं तुम्ही बोलत असताना तुम्हाला पाकिस्तानमध्ये सुरक्षितपणा वाटतो का? असा प्रश्न एका युजरने विचारला होता. "मी इथे खूप खूश आहे" अशाप्रकारे उत्तर देत कनेरियाने तो विषय तिथेच संपल्याचे दिसून येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News