कोरोनाच्या पाश्वभुमीवर छोट्या आयपीएलचे आयोजन? या खेळाडूंचा असणार समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 April 2020
राजस्थान रॉयल्स छोट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तयार आहे. आयपीएल म्हणजे इंडियन प्रिमिअर लीग भारतीय खेळाडूसांठीचे सामने आहेत.

नवी दल्ली: देशातील कोरोनाच्या पाश्वभुमिवर छोट्या आयपीएलचे आयोजन करणे योग्य आहे. छोट्या आयपीएलमध्ये फक्त भारतीय खेळाडुंचा समावेश असेल असे मत राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रंजीत बराकुर यांनी बुधवारी व्यक्त केले.

पुढे बोलताना रंजीत कुमार म्हणाले की, राजस्थान रॉयल्स छोट आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तयार आहे. आयपीएल म्हणजे इंडियन प्रिमिअर लीग भारतीय खेळाडूसांठीचे सामने आहेत. सध्या देशात खुप चांगले खेळाडू आहेत त्यामुळे आयपीएलमध्ये फक्त भारतीय खेळाडूंची निवड केली पाहीजे. कोरोनामुळे मोठ्या आयपीएलचे सामने आयोजिक करणे शक्य नाही. त्यामुळे छोटे छोटे सामने खेळवणे शक्य आहे. याबाबत बीसीसीआय १६ एप्रिलनंतर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसमुळे जगातील सर्व खेळ बंद करण्यात आले आहेत. बीसीसीआयने सध्यातरी आयपीएलविषयी कोणताही निर्णय घेतला नाही. २९ मार्च रोजी आयपीएलची सुरुवात करण्याचे नियोजन केले होते. मात्र, १५ एप्रिल पर्यंत सर्व खेळ रद्द करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी द्विपक्षिय खेळाचे आयोजन बीसीसीआय रद्द करेल आणि वर्षाच्या शेवटी आयपीएलचे आयोजन आयोजन करण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News