आधार मार्गदर्शन केंद्रात एकदिवशीय सेट- नेट कार्यशाळेचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

सेट- नेट परीक्षेच्या पहिल्या पेपर विषयी उदयगिरी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. एल. बी. पेन्सलवार विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करतील.

उदगीर: येथील मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित 'आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रा'त सेट- नेट परीक्षा आणि अभ्यासक्रमावर आधारीत रविवारी (15 मार्च) एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. सेट- नेट परीक्षेच्या पहिल्या पेपर विषयी उदयगिरी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. एल. बी. पेन्सलवार विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करतील.

दरवर्षी लाखो विद्यार्थी सेट- नेट परीक्षेला बसतात मात्र, 5 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. त्यामुळे सेट- नेट परीक्षा खुप अवघड माणली जाते. सेट- नेट परीक्षेचे योग्य नियोजन करुन अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना यश मिळविता येते. सेट- नेट परीक्षेत यश मिळविण्याचा मुलमंत्र डॉ. पेन्सलवार विद्यार्थ्यांपुढे उलघडणार आहेत. 

सेट- नेट परीक्षा व अभ्यासक्रमावर आधारीत मार्गदर्शन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे, मात्र कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी विद्यार्थ्यांना पुर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. सोलापुरे कमर्शिअल, नांदेड रोड, उदगीर येथे प्रत्यक्ष किंवा मोबाईल वरुन नोंदणी केली जाईल. नोंदणीसाठी संपर्क क्रमांक - 8975704163 

प्रतिकुल परिस्थितीमध्ये ग्रामीन भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतात. जिल्ह्याच्या ठिकणी जावुन ग्रामीन भागातील विद्यार्थ्यांना सेट- नेट परीक्षेचे मार्गदर्शन घेणे परवडणारे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीन भागातचं सेट- नेट परीक्षेचे मार्गदर्शन उपलब्ध करुन दिले आहे. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा.
- श्रीकांत जाधव, संचालक, आधार मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र, उदगीर

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News